नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे होणाऱ्या जनजाती गौरव दिनाचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते होणार आहे.त्यासाठी राज्यपाल १५ नोव्हेंबर रोजी नंदुरबारात येत आहेत.
राज्यपालांचा दौरा याआधीही जाहीर झाला होता. परंतु ऐनवेळी तो रद्द करण्यात आला होता. आता १५ नोव्हेंबर या तारखेचा दौरा जाहीर करण्यात आला आहे. सकाळी ११:३५ वाजता पोलिस कवायत मैदानावरील हेलिपॅडवर त्यांचे आगमन होणार आहे.
तेथून ते जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित जनजाती गौरव दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. १:३० ते २:३० दरम्यान संक्रीट हाऊसवर राखीव वेळ राहणार असून २:४० वाजता ते मुंबईकडे रवाना होणार आहेत.
राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे.








