Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अतिदुर्गम भादल गावाला खा. डॉ. हिना गावित यांच्यामुळे स्वातंत्र्यानंतर प्रथमच मिळाला पक्का रस्ता

team by team
November 11, 2023
in राजकीय
0
अतिदुर्गम भादल गावाला खा. डॉ. हिना गावित यांच्यामुळे स्वातंत्र्यानंतर प्रथमच मिळाला पक्का रस्ता

नंदुरबार l प्रतिनिधी

तोरणमाळ पासून खालच्या भागातील नर्मदा काठच्या भादल या महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला असलेल्या दुर्गम गावाला संसदरत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांनी भेट दिली आणि स्वातंत्र्यानंतर च्या 75 वर्षांनी प्रथमच या दुर्गम भागात बनत असलेल्या पक्क्या रस्त्याची पाहणी केली. या गावात प्रथमच कोणी उच्चपदस्थ राजकीय व्यक्ती आमच्याशी संवाद साधायला आला, अशी प्रतिक्रिया याप्रसंगी स्थानिक ग्रामस्थांनी दिली.

तोरणमाळ पासून खाली जाणाऱ्या दरीच्या दिशेने उतरल्यानंतर पुढे आणखी अनेक गाव पाडे स्वातंत्र्यपूर्व काळापासून वसलेले आहेत. अनेक सरकार आले गेले बदलले परंतु तिथपर्यंत न रस्ते बनले ना कोणते वाहन पोहोचले. उडद्या ते भादल पर्यंत 56 किलोमीटरचे अंतर स्थानिक रहिवाशांना कायमच पायी चालून पार करावे लागत आहे. 2014 यावर्षी खासदार डॉक्टर हिना गावित या प्रथमच भारतीय जनता पार्टीतून निवडून आल्या आणि त्यांनी सर्वप्रथम या भागात रस्ता मंजूर केला.

वनविभागाच्या कायदे नियमांचे अडथळे आणि अडचणी यामुळे रखडलेले ते काम आता वेगाने पूर्ण केले जात असून सातपुडा च्या पायथ्याशी मध्य प्रदेश सीमेपर्यंत डोंगराळ भागातील पहिला रस्ता आकाराला येत आहे. त्याची पाहणी संसद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केली. याला निमित्त होते भादल या गावात श्री शंकर आदिवासी विकास बहुउद्देशिय संस्था, धनाजे बु., ता.धडगांव आणि श्वेता रूरल फाऊंडेशन, धडगांव यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “एकच ध्यास सामाजिक विकास” कार्यक्रमांतर्गत संसदरत्न खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते साहित्य वाटपाचे.

तोरणमाळ पासून खालच्या भागातील गाव पाडे स्वातंत्र्यापासून आजपर्यंत रस्ते वीज पाणी आणि अन्य सुविधांपासून वंचित राहिले. ही मोठी दुरावस्था आहे. परंतु ही सर्व स्थिती पालटण्यासाठीच मी खासदार बनले असून भादल गावासह नर्मदा काठच्या महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला असलेल्या दुर्गम गावांपर्यंत नर्मदेचे पाणी आणून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणारी योजना राबवली जाईल, बारमाही पक्के रस्ते देण्याबरोबरच या भागात वीज खांब देऊ तसेच येथील कुणाच्या घरात राहणाऱ्यांना पक्की घरे दिली जातील; अशी ग्वाही संसद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांनी यावेळी दिली.

पाहणी करताना जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, भाजपाचे तालुका अध्यक्ष हिरा पाडवी, सामाजिक कार्यकर्ते सुभाष शंकर पावरा, माजी नगराध्यक्ष लतेश मोरे, सौ. सुरेखा लतेश मोरे, ॲड.जयश्री गावित, ॠषा गावित, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पराडके, नंदुरबार येथील भाजपाचे संतोष वसईकर, माजी गटनेते आनंदआण्णा माळी, मांगूभाऊ माळी, भादल ग्रामपंचायत सरपंच बुरकाताई पावरा, सिंधी दिगरचे सरपंच संदीप पावरा व अन्य उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचा मानवता की दिवाली हा उपक्रम स्तुत्य : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post

बारमाही रस्ते देण्यासोबतच दुर्गम गावांपर्यंत नर्मदेचे पाणी आणण्याची योजना राबवणार : खा.डॉ.हिना गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add