नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हयातील पुर्वपट्टयातील आदिवासी मागासवर्गीयाच्या जमिनी बेकायदेशिर बळकावणाऱ्या सुझलॉन व सर्जन रियालिटीज यांच्या विरोधात या भागातील शेतकरी मध्ये प्रचंड असतोष असुन या कंपनीने खोटे बोगस दस्त बनवुन या शेतकऱ्यांची फसवणुक केली आहे.
त्या कंपनीवर क्रिमीनल कोड १२०/ब व ४२०, ३४व अनु. जाती जमाती अॅक्ट (ॲक्ट्रॉसिटी) अंतर्गत गुन्हा दाखल करावा यासाठी ७ नोव्हेंबर २०२३ वार मंगळवार रोजी दुपारी १२:०० वाजता तिलाली सि.एस.एम. जवळील खारीखान जवळील भिला दौलत भील या आदिवासी शेतकऱ्याच्या शेतात “पोल तोडो जमीन छोडो आंदोलन” जमीन गमावलेले शेकडो आदिवासी मागासवर्गीय शेतकरी एकत्र येवुन निषेध आंदोलन व या बोगस दस्त जाळुन आंदोलन करणार आहेत.
या जनआंदोलनाचे नेतृत्व अरुण रामराजे समिती अध्यक्ष व शेतकरी, भिला दौलत भील, दामु कोसऱ्या भील, भिमसिंग पाडवी, बापू भील, तानु मान्या भील, यादव पाडवी, भिमराव सामुद्रे व असंख्य शेतकरी करणार आहेत १७ ऑक्टोंबर
२०२३ रोजी कंपनीने ८ दिवसात न्याय देण्याचे लेखी आश्वासन पोलीसांसमोर देऊनही ते न पाळल्याने सदर घटनेचा निषेध म्हणुन ही हे आंदोलन होत आहे.








