म्हसावद l प्रतिनिधी
तालुक्यातील शहादा-तळोदा मतदारसंघातील 10 पैकी 8 ग्रामपंचायतींवर भाजपाच्या निवडून आल्याचा दावा भाजपातर्फे करण्यात आला आहे.
आमदार राजेश पाडवी, ज्येष्ठ नेते दीपक पाटील, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत.
शहादा मतदार संघ अंतर्गत तालुक्यातील दहा पैकी आठ ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाचे सरपंच व सदस्य निवडून आले आहेत. यामध्ये कमरावद, कर्जोत, गनोर, लक्कडकोट, दामळदा, गोगापूर, कुडावद व पिंपरी या आठ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
मतदार संघातील जनतेने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मते देऊन निवडून आणले आहे. भाजपाच्या उमेदवारांवर दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवू अशी प्रतिक्रिया विजयानंतर उमेदवारांकडून व्यक्त करण्यात आली आहे. विजयी उमेदवार, समर्थक व ग्रामस्थांनी विजयानंतर जोरदार जल्लोष केला. आमदार राजेश पाडवी, भाजपाचे ज्येष्ठ नेते दीपक पाटील, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.