Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार शहरात 101 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

team by team
November 4, 2023
in क्राईम
0
नंदूरबार शहरात 101 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

नंदुरबार l प्रतिनिधी

जिल्ह्यातील दूध भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय दूध भेसळ नियंत्रण समिती स्थापन केलेली असून या समितीमार्फत नुकतेच जिल्ह्यातील विविध भागात दुधाची तपासणी करुन 101 लिटर भेसळयुक्त दुध नष्ट करण्यात आले असल्याची माहिती सदस्य सचिव दूध भेसळ प्रतिबंध समिती तथा जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. अमित पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

सदर समितीची कारवाई अपर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष धनंजय गोगटे, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. मनोज पावरा नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून यावेळी
जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. अमित रमेश पाटील, सहाय्यक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन डी. डी. तांबोळी, क्षेत्रसहाय्यक वैध मापनशास्त्र एस. वी. सोनवणे, विस्तार संकलन प्रितेश गोंधळी, मुकेश तमायचेकर, विजय भदाणे तसेच पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नंदुरबार शहरी भागातील देसाईपुरा, राजपुत पेट्रोल पंप, कोकणी हिल, संजय नगर, अंधारे स्टॉप इत्यादी परिसरात दूध विक्री संकलन करुन विक्री करणाऱ्या डेअरी तसेच दूध पुरवठा फेरीवाले ठेलावाले यांच्याकडील दूधाची तपासणी स्वयंचलित उपकरणाव्दारे करण्यात आली. या कारवाईमध्ये एकुण 9 दूध विक्रेत्यांच्या एकूण सरासरी 419 लिटर दूधाच्या विविध साठ्यातील नमुन्यांची तपासणी करुन 4 दूध विक्रेत्याच्या दूध साठ्यांमध्ये पाण्याची भेसळ, अनैसर्गिक वास, चव, कचरा, अस्वच्छता आढळुन आली. यामध्ये 9 लिटर गाईचे व 92 लिटर म्हशीचे असे एकूण 101 लिटर भेसळयुक्त दुध नष्ट करण्यात आले.

यावेळी वैध मापनशास्त्र विभाग, धुळे यांच्यासोबत संयुक्त पथकाव्दारे दूध मोजण्याची मापे, इलेक्ट्रॉनिक तोलन यंत्र- यांच्या मुद्रांकनाची पडताळणी करण्यात आली. त्यातील 2 दूध विक्रेत्यांच्या डेअरीतील, वापरातील वजन मापे ही मुद्रांकन व पडताळणी उल्लंघन आढळुन आल्याने वैध मापनशास्त्र अधिनियमअंतर्गत खटले नोंदविण्यांत आले आहेत. तसेच अन्न व औषध प्रशासन ‘विभागामार्फत नंदुरबार जिल्ह्यातील इतर तालुक्यांत 02 दूध नमुने व 04 स्विट्स नमुने तपासणीसाठी घेण्यांत आले आहे.

जिल्ह्यातील दूध विक्रेते व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, दूध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणे व भेसळ नियंत्रण मोहिमेस मज्जाव करणे हा कायद्याने गुन्हा असून दूध पुरवठादार व दूध विक्रेत्यांनी पाणी किंवा कुठल्याही प्रकारची भेसळ न करता, स्वच्छ दूध हाताळणी व स्वच्छ कार्यपध्दतींचा अवलंब करून विनाभेसळ दूध वाहतुक व वितरण करावे. भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य खाद्यपदार्थामुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असतो. यामुळे भेसळ करणाऱ्यांविरोधात भविष्यात दंडनीय व कायदेशीर करवाई करण्यांत येईल. तसेच दूध भेसळ प्रतिबंध समितीच्या कार्यवाहीस अटकाव, अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्ती व आस्थापनेविरोधात कठोर कारवाई करण्यांत येईल, असेही प्रसिद्धीपत्रकानुसार श्री. पाटील यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या शेतातून 18 लाखांचा गांजा जप्त करीत केली अटक

Next Post

बचतगटांच्या माध्यमातून शहादा तालुक्यात केळी, पपई वरील प्रक्रिया उद्योग सुरू करणार : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add