नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यातील नंदुरबार, अक्कलकुवा शहादा तालुक्यात आज चार कोरोना रुग्ण आढळले त्यामुळे एकच खळबळ उडाली.
नंदूरबार जिल्ह्यात अनेक दिवसांपासून कोरोना रुग्ण आढळले. मात्र आज तब्बल तीन तालुक्यात कोरोना रुग्ण आढळले त्यामुळे एकच खळबळ उडाली. आज प्रशासनातर्फे ९४ जणांचा कोरोना अहवाल प्राप्त झाला यात नंदुरबार शहरातील कोरीट रोड येथे १, अक्कलकुवा येथे 1, शहादा तालुक्यातील लोणखेडा, जुनवणे येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.नुकताच तळोदा तालुका कोरोनामुक्तत झाला आहे.सध्याच्या घडीला नंदुरबार जिल्ह्यात ११ कोरोना रुग्ण आहेत.तर धडगाव तालुक्यात अद्याप कोरोणाचा शिरकाव झाला नाही.