Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कंत्राटी मजुर ठेका पद्धत कायमस्वरुपी बंद करा भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेतर्फे निवेदन

Mahesh Patil by Mahesh Patil
October 4, 2021
in राज्य
0
कंत्राटी मजुर ठेका पद्धत कायमस्वरुपी बंद करा भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेतर्फे निवेदन

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व शासकीय आस्थापनांमध्ये चालणारी कंत्राटी मजुर ठेका पद्धत कायमस्वरुपी बंद करुन त्याच कंत्राटी मजुरांना जॉबकार्ड देवून त्यांचा पगार थेट त्यांच्या बँक खात्यावर पाठवून त्या मजुरांचे होत असलेले शोषण तात्काळ थांबविणेबाबत संबंधितांना आदेशित करण्यात यावेत, अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेतर्फे करण्यात आली. तसे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाठविण्यात आले आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील चालणारी कंत्राटी मजुर ठेका व ठेकेदारी ही गरीब, असंघटीत, दलित, बहजन मजुरांचे शोषण करणारी आहे व शोषण केले जात आहे. ही पद्धत पूर्णपणे बोगस व बेकायदेशिर आहे. ही ठेकेदारी त्या-त्या ठिकाणाचे संबंधित भ्रष्ट अधिकारी व सत्ताधार्‍यांनी मिलीभगत बनवुन दलालांमार्फत चालविलेली ठेकेदारी ही खुशाल चरण्याचे हरित कुरण आहे, याची दखल घ्यावी. ९५ टक्के ठेकेदारांकडे मनुष्यबळ पुरविण्याचा मा.सहाय्यक कामगार आयुक्तांचा परवाना नाही. कष्टकरी मजुरांना त्यांचा पगार बँकेतून दिला जात नाही. तसेच शासनाच्या किमान वेतनानुसार पगार न देता तुटपुंजी मजुरी देवून त्याचे शोषण केले जात आहे. त्यांच्या इपीएफ भरला जात नसून त्यांना कुठल्याही सुविधा दिल्या जात नाहीत. ही सर्व बोगसगिरी असून मजरांचे शोषण आहे. या कंत्राटी मजुर ठेका कार्यात मोठ्या प्रमाणात महाभ्रष्टाचार झालेला आहे व आजमितीस चालु आहे. भारत सरकार मान्यता प्राप्त भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटना, महाराष्ट्र राज्याची आपणाकडे विनंती आहे की, विषयात नमुद केल्याप्रमाणे तात्काळ आदेशित करुन मायबाप सरकाराने कंत्राटी मजूर कामगारांचे शोषण थांबुन त्यांना सुखाने दोन घास खाण्यास सहकार्य करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देतेप्रसंगी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष बंटी नेतलेकर, महाराष्ट्र उपाध्यक्षा सौ.सुरेखाताई भालचंद्र वाघ,  नंदुरबार जिल्हाध्यक्ष संतोष भिका अहिरे, महिला जिल्हाध्यक्षा सौ.पुष्पाताई रेवा गावीत, नंदुरबार तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, चौरेनाथ ठाकरे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार जिल्ह्यात आज आढळले ४ कोरोना रुग्ण, अक्कलकुवा शहादा तालुक्यांचा समावेश

Next Post

तळोदा महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनाच्या वार्षिक प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन

Next Post
तळोदा महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनाच्या वार्षिक प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन

तळोदा महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनाच्या वार्षिक प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

July 1, 2025
छायाचित्र व्यवसायात नावाजलेले व्यक्तिमत्व कै.रामभाऊ पाटील

छायाचित्र व्यवसायात नावाजलेले व्यक्तिमत्व कै.रामभाऊ पाटील

July 1, 2025
सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांसाठी ऑनलाईन सुनावणीची सुविधा : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

आज होणार 639 ग्रामपंचायतींमधील महिला सरपंच पदाचे आरक्षण सोडत

July 1, 2025
नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता

नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता

July 1, 2025
नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

June 30, 2025
डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

June 30, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group