Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यात मनाई आदेश जारी

team by team
November 2, 2023
in क्राईम
0
पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित, दिव्यांग कल्याण अध्यक्ष बच्चू कडू यांच्या उपस्थितीत  ‘दिव्यांगांच्या दारी’ अभियान

नंदुरबार l प्रतिनिधी

 

 

जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी 1 नोव्हेंबर सकाळी 6 वाजेपासून 15 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. सदरचे मनाई आदेश संपूर्ण जिल्ह्याला लागू राहतील.

 

 

या काळात सोटे, तलवारी, बंदूका, भाले, सुरे, लाठ्या किंवा शारिरीक दुखापत करण्यासाठी वापरात येतील अशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तू बरोबर घेवून फिरता येणार नाही. तसेच अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ किंवा द्रव्ये बरोबर घेवून फिरता येणार नाही. दगड अगर अस्त्रे, सोडावयाची अगर फेकण्याची हत्यारे, साधने इत्यादी तयार करणे, जमा करणे किंवा बरोबर नेणे यावरही निर्बंध घालण्यात आलेले आहे.

 

 

 

सार्वजनिक शांतता धोक्यात येईल असे भाषण करणे, हावभाव करणे अथवा सॉंग आणणे असे प्रकार करता येणार नाही. याचबरोबर जाहिरपणे घोषण देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे तसेच कोणत्याही व्यक्तीची आकृती किंवा प्रतिमेचे प्रदर्शन करणे अगर दहन करणे या आदेशाचे उल्लंघन समजले जाईल.

 

 

 

या मनाई हुकुमान्वये पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किंवा त्यांनी अधिकार प्रधान केलेले इतर अधिकारी यांचे पूर्व परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश असलेल्या जमाव जमणेस किंवा मिरवणुकीस या आदेशात मनाई आहे. सदरची परवानगी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती बघून देण्यात येईल.

 

 

 

नंदुरबार जिल्ह्यात 8 नोव्हेंबर 2023 ते 14 नोव्हेंबर 2023 या कालावधीत धडगांव येथे श्री. अस्तंबा यात्रा भरते. वसुबारसपासून भाविक सातपुड्यातील अस्तंबा शिखर चढण्यास सुरुवात करतात व लक्ष्मीपुजनाचे दिवसापावेतो घरी परत येत असतात. सदर यात्रेस मध्यप्रदेश, गुजरात व महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेच तळोदा पोलीस ठाणे हद्दीत मोरवड (रंजनपूर) येथे दिवाळीच्या दिवशी संत गुलाम महाराज व संत रामदास यांचे समाधीस्थळी आरती पूजन कार्यक्रम (आदिवासी मेळावा) कार्यक्रम होत असतो.

 

 

 

सदर कार्यक्रमासही महाराष्ट्रासह मध्यप्रदेश व गुजरात राज्यातील आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर हजेरी लावतात. तसेच सध्याचे महाराष्ट्र राज्यातील सध्याचे राजकीय व सामाजिक वातावरण बघता जिल्ह्यात विविध संघटनांतर्फे धरणे, मोर्चे, बंद इत्यादी आंदोलने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वैयक्तिक व सामूहिकरीत्या आमरण / लाक्षणिक उपोषण करण्यात येतात. यामुळे नंदुरबार जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी मनाई हुकूम जारी केला आहे.

 

 

 

नंदुरबार जिल्ह्यात 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना जमण्यास मनाई आहे. करीता या कालावधीत असा जमाव जमल्यास त्यांच्यावर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्या बाबत कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

पी.आर.पाटील
पोलीस अधीक्षक, नंदुरबार

बातमी शेअर करा
Previous Post

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव

Next Post

मोठी बातमी : उमर्दे येथे गुलाब मराठे यांनी उपोषण सोडले

Next Post
मोठी बातमी : उमर्दे येथे गुलाब मराठे यांनी उपोषण सोडले

मोठी बातमी : उमर्दे येथे गुलाब मराठे यांनी उपोषण सोडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add