नंदुरबार l प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी उमर्दे येथे गुलाब मराठे यांनीही उपोषण सुरु केले आहे. उपोषणाच्या सातव्या दिवशी गुलाब मराठे यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी आरोग्य पथक उमर्दे येथे दाखल झाले आहे.
दरम्यान या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा साम्राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबाराजे देशमुख उद्या दि.1 नोव्हेंबर रोजी उमर्दे येथे दाखल होणार आहेत.
अंतरावली-सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणास व आंदोलनास जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. याच अनुषंगाने उमर्दे येथे गुलाब महारू मराठे हेदेखील उपोषणास बसले आहेत. त्यांच्या उपोषणास जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांकडून मोठा पाठिंबा मिळत सहभाग आहे. गुलाब मराठे यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी आरोग्य पथक उमर्दे येथे दाखल झाले आहे.
दरम्यान या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा साम्राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबाराजे देशमुख उद्या दि.1 नोव्हेंबर रोजी उमर्दे येथे दाखल होणार आहेत. त्यांची जाहीर सभेचे आयोजन सायंकाळी 5.30 वाजेला करण्यात आले आहे.








