नंदुरबार l प्रतिनिधी
वैद्यकीय सेवेसोबत सामाजिक जाणीव ठेवत नंदुरबार येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ प्रशांत ठाकरे व डॉ प्रीती ठाकरे ह्या दांपत्याने मातृ-पितृ छत्र हरपलेल्या विद्यार्थिनीचे शैक्षणिक पालकत्व स्विकारत वैद्यकीय क्षेत्रासमोर नवा आदर्श उभा केला.
समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन त्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी निव्होप्रेरणा फाउंडेशन सारख्या संस्थांनी पुढाकार घेतलेला आहे. म्हणूनच बहुजनांसाठीची शैक्षणिक चळवळ अविरत चालू आहे असे प्रतिपादन डॉ प्रशांत ठाकरे यांनी याप्रसंगी केले.

साक्षर क्रांती शिष्यवृत्ती च्या माध्यमातून डॉ काणे गर्ल्स हायस्कूल मधील प्रथम आलेल्या भूमी पवारला तिच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचवावा यासाठी इयत्ता दहावीपासून शिष्यवृत्ती प्रदान केली जात आहे. डॉ ठाकरे दांपत्याने भूमी हीचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारत एक नवा आयाम प्रथापित केला असे प्रतिपादन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मोडक यांनी केले.फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध कंठे यांनी “होतकरू विद्यार्थिनींना आयएएस आयपीएस यांसारख्या सनदी सेवेतून देशाची सेवा घडावी त्यासाठी पुढील शिक्षणासाठीही शिष्यवृत्ती दिली जाईल” असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निव्होकेअर फार्मा.चे विभाग व्यवस्थापक स्वप्नील राजपूत यांनी प्रयत्न केले.
त्यांना साक्षर क्रांति सल्लागार अनिल चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.सीमा मोडक, पर्यवेक्षक मिलिंद चव्हाण, संस्थेचे कार्यकारणी सदस्य चंद्रशेखर यार्दि व शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.








