नंदुरबार l प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी उमर्दे येथे गुलाब मराठे यांनीही उपोषण सुरु केले आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशी गुलाब मराठे यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी आरोग्य पथक उमर्दे येथे दाखल झाले आहे.

दरम्यान या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी जिल्हाभरातील विविध गावांमधील शेकडो तरुणांनी मोटारसायकल रॅली काढून आरक्षण न दिल्यास आहे. यात महिलांचाही लक्षणीय आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.
अंतरावली-सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणास व आंदोलनास जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे.
याच अनुषंगाने उमर्दे येथे गुलाब महारू मराठे हेदेखील उपोषणास बसले आहेत. त्यांच्या उपोषणास जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांकडून मोठा पाठिंबा मिळत सहभाग आहे. जिल्ह्यातील विविध गावातील शेकडो समाज बांधवांनी आपापल्या गावातून मोटारसायकलीने येत नंदुरबार शहराबाहेरील रस्त्यावरील उड्डाण पूल ते गावापर्यंत रॅली काढून उपोषणाला पाठिंबा दिला. ही रैली गावातूनही काढण्यात आली. यावेळी विविध घोषणांनी परिसर दणाणला होता दररोज मराठा समाजातील नेते पदाधिकारी व समाज बांधव शेकडोंच्या संख्येने येऊन गुलाब मराठे यांना पाठिंबा देत आहेत.
रविवारी सकाळी तहसीलदार नितीन गर्जे व पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी भेट देऊन उपोषणकर्ते गुलाब मराठे व ग्रामस्थांशी चर्चा करुन तुमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचल्या असून उपोषण सोडण्याची विनंती केली.
मात्र जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे गुलाब मराठे यांनी सांगितले.
नंदुरबार तालुक्यातील उमर्दे हे गाव जिल्ह्यातील आंदोलकांचे केंद्रबिंदू ठरले आहे.बायपास दरम्यान, शनिवारी सायंकाळी उमर्दे उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उमर्दे गावातून सकल मराठा समाजातर्फे कँडल मार्च काढण्यात आला होता. त्यात जिल्हाभरातील हजारो समाज . बांधव, महिला, तरुण-तरुणींनी सहभाग , घेतला होता. यावेळी समाजाच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.








