नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील भालेर वडवद ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. वैशाली दिनेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
भालेर ग्रामपंचायत कार्यालयावर निवडणुकीची प्रक्रिया घेण्यात आली निवडणूक अधिकारी म्हणून मंडळाधिकारी एन.डी.पानपाटील यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामविकास अधिकारी एस.पी.पाटील, तलाठी एन.पी. महाले यांनी निवडणूक प्रक्रियेत मदत केली. भालेर ग्रामपंचायतीची स्थापना २२-३-१९५६ रोजी झाली, ग्रामपंचायत एकूण ११ सदस्य आहेत. २०२१ साली निवडणूक झाली.
दुसऱ्या टर्मसाठी सरपंच पदी सौ.वैशाली दिनेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाने फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी सौ.पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी शेतकरी संघाचे अध्यक्ष बी.के. पाटील, काकेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष भास्कर पाटील,उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, शिवसेना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष सयाजी मोरे, नवीन बिर्ला, नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील पाटील,मधुकर पाटील, दिनेश पाटील,तिसी चे लोकनियुक्त सरपंच दिलीप पाटील, सामाजिक कार्यकर्ते अविनाश पाडवी तसेच गावातील व परिसरातील पदाधिकारी व ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या.