नंदुरबार l प्रतिनिधी
मुंबईत आझाद मैदानावर झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेनेच्या (शिंदे गट) जिल्हाभरातील शिवसैनिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळपासूनच दाखल झालेल्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत शक्ती प्रदर्शन केले.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी व शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी,किरसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरातील शिवसैनिकांनी आझाद मैदानावर शक्तिप्रदर्शन करीत सहभागी झाले होते. ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की, जय’ अशा घोषणा देण्यात आल्या. सकाळपासूनच जिल्ह्यातील शिवसैनिक मुंबई दाखल झाले होते. त्यानंतर दुपारी शिवसैनिकांचे गटागटाने आजाद मैदानाकडे पाय वळू लागले.
नंदुरबार जिल्ह्यातील शहरी भागापासून ते दुर्गम अतिदुर्गम भागाचा शेवटच्या टोका पर्यंतच्या शिवसैनिकांनी दसरा मेळाव्यात हजेरी लावली होती.त्यामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणावर यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले.
दसरा मेळाव्यातून प्रेरणा; जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी
नंदुरबार जिल्ह्यातील शिवसैनिकांनी दसरा मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व धर्मवीर आनंदराव दिघे यांच्या विचारांची प्रेरणा मेळाव्यातून मिळाली. शहरी भागापासून ते थेट जिल्ह्याच्या दुर्गम अधिक दुर्गम भागातील शिवसैनिकांची उपस्थिती लाभली.
बाळासाहेबांच्या पेहरावाने वेधले लक्ष
बाळासाहेब ठाकरे यांच्या पेहराव करीत शिवप्रेमी नागरिक रणजीतसिंह राजपूत आझाद मैदानावर दाखल झाल्याने सर्वच शिवसैनिकांचे लक्ष वेधून घेतले होते. मेळाव्याला उपस्थित शिवसैनिकांशी त्यांनी ठाकरे शैलीत संवाद साधला. काहींनी त्यांच्यासोबत सेल्फी घेतली.








