नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी ऑफ इंडीया) नंदुरबार येथे अरुण श्रीराम महाजन यांना लाईफ इन्शुरन्स कंपनीतील सर्वात महत्त्वाचा मोठा बहुमान एमडीआरटी-२०२४ (मिलियन डॉलर राऊंड टेबल) मिळाला.
जे प्रतिनिधी दरवर्षी एमडीआरटीचे ठरलेले उद्दीष्ठ पूर्ण करतात त्यांना विमा कंपनीतर्फे एमडीआरटी म्हणून घोषीत करण्यात येते. कामात सातत्य आणि ग्राहकांना उत्तम सेवा दिल्याबद्दल प्रतिनिधींची शिफारस केली जाते. त्यात अरुण महाजन गेल्या चार वर्षापासून पात्र ठरत आहेत.
नंदुरबार शाखेतील सलग चौथ्यांदा एमडीआरटीचा बहुमान मिळवणारे ठरले आहेत. अरुण महाजन यांचा नंदुरबार येथील एलआयसी शाखेत गौरव करण्यात आला. यावेळी नंदुरबार शाखाधिकारी श्रीकांत मुळे, उपशाखाधिकारी वेदप्रकाश मीणा, विकास अधिकारी प्रकाश चव्हाण तसेच एजंट व कर्मचारी उपस्थित होते.