शहादा l प्रतिनिधी
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी जयसिंग पावरा याची राज्यस्तरीय भालाफेक स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विभाग स्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय शहादा येथील जयसिंग भायला पावरा या खेळाडूने 40 मीटर पेक्षा अधिक अंतरावर भाला फेकत उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करीत प्रथम क्रमांक प्राप्त केला.
त्याची चंद्रपूर येथे होणाऱ्या आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.विजेत्या खेळाडूचे
संस्थेचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील,प्राचार्य डॉ.आर. एस.पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. कल्पना.के.पटेल, पर्यवेक्षक प्रा. के एच.नागेश, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ.अरविंद कांबळे,क्रीडा शिक्षक प्रा.जितेंद्र माळी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.








