नंदूरबार l प्रतिनिधी
वडबारे ता. नंदुरबार येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे फलक अनावरण करण्यात आले. वटबारे मनसे शाखेच्या अध्यक्षपदी योगेश पाटील, उपाध्यक्षपदी भाईदास पाटील तर सचिवपदी गोकुळ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नंदुरबार तालुक्यातील वटबारे गावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शाखा सुरू करण्यात आली आहे. यावेळी वटबारे मनसे शाखेचे फलक अनावरण मनसेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, मनसेचे सरपंच रेखाबाई माळी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मनसेच्या वटबारे शाखेची कार्यकारणी गठीत करण्यात आली असून वटबारे शाखेच्या अध्यक्षपदी योगेश पाटील, उपाध्यक्षपदी भाईदास पाटील, सचिव गोकुळ पाटील, सहसचिव छगन नरुटे यांची नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी मनसेचे नंदुरबार तालुकाध्यक्ष राकेश माळी, जिल्हा सचिव पवनकुमार गवळे, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुनिल कोंकणी.दिनेश मराठे.उमेश मदने, सतिराम कुवर, हितेश पाटील, गोकुळ ठाकरे, अशोक ठाकरे, क्रिष्णा मदने, नाना मदने, गोरख कोळपे, कौतिक कोळपे, दीपक पाटील, मगा मदने, बापू वळवी, पप्पु कुवर, समाधान नरुटे, यादव मदने, अनिल कुवर, झुलाल नरुटे, दशरथ कुवर, दौलत कुवर आदी उपस्थित होते.








