नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्र कार्यक्रमांतर्गत 11 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने शुभारंभ करण्यात आला असल्याचे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त विजय रिसे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी, पिंपळखुंटा, मोरंबा, तोरणमाळ, राजबर्डी, मांडवी बु, बोरद, म्हसावद, प्रकाशा, रनाळा व खांडबारा या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोरद केंद्रावर आमदार राजेश पाडवी, तसेच प्रकाशा केंद्रावर जिल्हा परिषदेचे अध्यक्षा सुप्रिया गावीत, निलेश माळी गावातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. असेही श्री. रिसे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.








