नंदुरबार l प्रतिनिधी
येथील अग्रवाल समाज नवयुवक मंडळ व महिला मंडळ यांच्या वतीने अग्रसेन महाराज जयंतीनिमित्त नंदुरबार उद्योग प्रदर्शन मेळावा पार पडला. या मेळाव्यात अग्रवाल समाजातील अनेक उद्योजकांनी आपल्या उद्योजकासंदर्भात सादरीकरण केले.
नंदुरबार शहरातील अग्रवाल भवनात अग्रवाल समाज नवयुवक मंडळ व महिला मंडळातर्फे अग्रसेन महाराज जयंती निमित्त उद्योग प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात अग्रवाल समाजातील उद्योजकांनी आपल्या व्यवसायिका संदर्भात स्टॉल लावून आलेल्या समाज बांधवांना उद्योजका संदर्भात माहिती दिली.
या कार्यक्रमाला अग्रवाल समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी नंदुरबार शहर अग्रवाल समाज नवयुवक मंडळाचे अध्यक्ष मयूर अग्रवाल, सचिव राहुल अग्रवाल, महिला मंडळाचे अध्यक्ष सीमा अग्रवाल, महिला मंडळ सचिव रूपा अग्रवाल आदींनी परिश्रम घेतले.








