नंदुरबार l प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचा रोटरी उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार हा उपक्रम वाखाणण्याजोगा आहे. रोटरी नंदनगरीतर्फे दिला जाणारा रोटरी उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार शिक्षकांसाठी प्रेरणादायी असून या पुरस्कारातून प्राप्त झालेली ऊर्जा पुरस्कारप्राप्त शिक्षकांना अधिक जोमाने शैक्षणिक कार्य करण्यास मदत करेल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केले. ते रोटरी क्लब ऑफ नंदनगरी आयोजित रोटरी उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
नंदुरबार येथील कन्यादान मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या रोटरी उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुप्रिया गावित या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी श्रीमती वंदना वळवी, श्री चिंतामणी एज्युकेशन संस्थेचे सचिव युवराज पाटील, ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक रमाकांत पाटील, असिस्टंट गव्हर्नर चेतन सिसोदिया, उद्योगपती मदनलाल जैन, रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष फखरुद्दीन जलगुणवाला, सचिव आकाश जैन आदी उपस्थित होते.
याप्रसंगी पुढे बोलताना डॉ. विजयकुमार गावित म्हणाले की, रोटरी क्लब ऑफ नंदनगरी समाजाच्या तळागाळातील घटकांसाठी देखील स्तुत्य असे उपक्रम राबवित असते ते गौरवास्पद आहे. शिक्षकांनी देखील विविध उपक्रम राबवून शैक्षणिक क्षेत्रातील बदल स्वीकारून तंत्रज्ञानाच्या आधारे अध्यापन करायला हवे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होईल. बोलीभाषेतून शिक्षण ही संकल्पना उदयास येत आहे असे देखील ते म्हणाले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावित म्हणाल्या की शिक्षक हे राष्ट्र निर्मितीचे महत्वाचे काम करीत असतात. रोटरी उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार म्हणजेच शिक्षकांनी समाजाप्रती व शिक्षणाप्रती केलेल्या चांगल्या कामाची पावतीच होय. या पुरस्काराची इतरांना देखील प्रेरणा मिळेल. या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी उत्कृष्ट संस्थेचा पुरस्कार जामिया इस्लामिया इशातुल उलूम या संस्थेच्या वतीने डॉ शेख मुजफ्फर अहमद यांनी स्वीकारला तर उत्कृष्ट संस्था चालक म्हणून सुवार्ता अलायन्स मिनिस्ट्रिज चे कार्यकारी संचालक राजेश वळवी, पश्चिम खांदेश भिल्ल सेवा मंडळाचे रोहन नटावदकर तर प्रशासकीय अधिकारी म्हणून डॉ.वनमाला पवार यांनी त्यांचे पुरस्कार स्वीकारले.
तर रोटरी उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जगदीश सुदाम पाटील, राजू देवराम कदमबांडे, संजय धुडकू भोई, रवींद्र सदाशिव वाघ, ज्ञानेश्वर रमण कोळी, शांताराम नथ्थू पाटील, पठाण फारुखखान नसीरखान, लक्ष्मीकांत विठ्ठल भोसले, डॉ.मयूर चंद्रकांत ठाकरे, सचिन आव्हाड, श्रीमती गिरीबाला पवार, उषा केसरसिंग राजपूत, लक्ष्मीपुत्र उप्पीन, रविकिरण दगाजी सोनवणे, हमीद गुलाबनबी खाटीक, वनसिंग सारपा वळवी यांना मिळाला तर रोटरी उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार प्रकाश फकीरा पाटील, सयाजीराव पुंडलिक सोनवणे यांना मिळाला. याच सोहळ्यात रोटरी लिटरसी च्या माध्यमातून रोटरी डिस्ट्रिक्ट 3060 तर्फे नेशन बिल्डर अवॉर्डचे देखील वितरण यावेळी करण्यात आले.
या नेशन बिल्डर अवॉर्ड मध्ये प्रभाकर श्रीधर नांद्रे, सय्यद शाहिद अली, नरेंद्र तुंबा पाटिल, राजेश रणछोड जाधव, राजेंद्र नारायण बागुल, कल्पेश मच्छिंद्रगीर गोसावी, मनोज मधुकर सोनार, मुकेश प्रल्हाद पाटील, अन्सारी अक्रम फरोग अहमद, जयेश लक्ष्मणभाई वाणी, ज्ञानेश्वर पंडित महाले, मनोजकुमार पोपट चौधरी, मनोज उखा पिंपरे यांच्यासह रोटरी क्लब ऑफ नंदनगरीमधील शिक्षकांना देखील नेशन बिल्डर अवॉर्ड गौरविण्यात आले त्यात नागसेन जयदेव पेंढारकर, प्रवीण पाटील, किरण रघुनाथ दाभाडे, फैयाज खान मुनाफ खान, राकेश आव्हाड, शेख इक्बाल शेख उमर, सय्यद इसरार अली कमर अली यांचा समावेश आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक प्रवीण पाटील यांनी केले सूत्रसंचालन किरण दाभाडे व आभार राकेश आव्हाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.विशाल चौधरी, निलेश तवर, प्रवीण पाटील, सय्यद इसरार अली, नागसेन पेंढारकर, नंदकिशोर सुर्यवंशी, विकास तोष्णीवाल, पार्थ चौधरी, अनिल शर्मा, फय्याज खान, इक्बाल शेख, प्रितिश बांगड आदींनी परिश्रम घेतले.








