नंदुरबार l प्रतिनिधी
संजय स्मृती संचलित लोकनेते स्व. बटेसिंगभैय्या रघुवंशी सभागृहाचे उद्घाटन मदत,पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन तसेच पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने त्यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला.
जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी लोकनेते स्व.बटेसिंगभैय्या रघुवंशी सभागृहाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी होते.यावेळी आ.शिरीषकुमार नाईक,आ.राजेश पाडवी यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी पालकमंत्री अनिल पाटील म्हणाले, काल परवा भारत-पाकिस्तानची ५० षटकांची क्रिकेट मॅच झाली.२० षटकांची ट्वेंटी-ट्वेंटी खेळली जाते.परंतु, आगामी काळातील संभाव्य निवडणुका व कमी कालावधीसाठी मंत्री झाल्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी एका षटकातच सर्व प्रश्न मार्गी लावायचे आहेत.
यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, यंदा कमी पाऊस झाल्यामुळे नंदुरबार तालुका दुष्काळ जाहीर करावा. रखडलेले सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करावेत अशी मागणी त्यांनी केली. प्रसंगी उद्योजक मनोज रघुवंशी, माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे,शिवसेना जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे, जिल्हा परिषदेचे माजी अधक्ष वकील पाटील, पंचायत समितीच्या सभापती दीपमाला भील,उपसभापती प्रल्हाद राठोड,जि.प सदस्य विजय पराडके,
शेतकी संघाचे चेअरमन बी.के पाटील, विधायक समितीचे सचिव यशवंत पाटील,माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे,जि.प सदस्य देवमन पवार, जि.प सदस्य रवींद्र पराडके, धडगावचे नगराध्यक्ष धनसिंग पावरा, धडगाव पं.स सभापती हिराबाई पराडके,शिवसेना महिला जिल्हा प्रमुख ज्योती पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमसिंह वळवी,तालुका प्रमुख डॉ.सयाजीराव मोरे, संजय स्मृतीचे ट्रस्टी नाथ्या वळवी,महानगर प्रमुख विजय माळी,धडगाव पं.स उपसभापती भाईदास अत्रे,माजी सभापती कैलास पाटील,शिवसेना महिला जिल्हा प्रमुख विद्या वळवी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, सरपंच, माजी सभापती यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








