नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने नंदुरबार जिल्हा अंतर्गत नुकतीच कुस्ती निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. गादी व मॅट विभागात अनेक नवोदित युवा पैलवानांनी सहभाग नोंदविला. दरम्यान येत्या चार ते नऊ नोव्हेंबरला पुणे जिल्ह्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार आहेत.

नंदुरबार जिल्हा कुस्तीगीर तालिम संघाचे अध्यक्ष व माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते नुकतीच निवड चाचणी घेण्यात आली. खामगाव रस्त्यावरील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित या निवड चाचणी प्रसंगी सर्वप्रथम शक्ती प्रेरक बजरंगबली यांच्या प्रतिमेचे पूजन करून निवड चाचणीस प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी गादी विभागातून 57 किलो वजन गटातून निखिल पवार, 61 किलो वजन गटातून राम चौधरी, 74 किलो वजन गटातून पराग परदेशी तर माती गटातून 57 किलो वजन गटात वेदांत मराठे यांची निवड करण्यात आली.
निवड चाचणी कुस्ती स्पर्धेसाठी पंच म्हणून धुळे येथील महाराष्ट्र कुस्तीगीर महासंघाचे राज्य उपाध्यक्ष सुनील चौधरी, धुळे जिल्हा तांत्रिक समिती प्रमुख त्रिलोक गुंडलेकर, सचिन कराड, बाबा कोळी, शाम कानडे, सोनू गीते तसेच नंदुरबार येथील अर्जुन सुधाकर मराठे, लल्ला मराठे यांनी काम पाहिले.निवड चाचणी कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा खजिनदार ईश्वर धामणे, उपाध्यक्ष बलवंत जाधव, सचिव जय मराठे, माजी नगरसेवक प्रशांत चौधरी, गौरव चौधरी,रविंद्र चौधरी, रामा हटकर, नायब कुरेशी,हनी खाटिक,प्रमोद पाटील,ईश्वर मराठे, महेंद्र बडगुजर, भूषण मराठे, दर्शन मराठे, शिवम मराठे, प्रकाश मराठे, निखिल पवार, तुषार वसईकर, गणेश वसईकर, कपिल गिरासे आदि उपस्थित होते.








