शहादा l प्रतिनिधी
वृक्ष लागवड केल्यावर थांबु नका त्याचे जतन करा.माती व पाणी संवर्धनासाठी केतकी कंद पर्यावरणाचे संरक्षक म्हणुन कार्य करतील असे प्रतिपादन शहादा परिसराचे युवा नेते मयुर दिपक पाटील यांनी केले.
सातपुडा येथील जायन्टस गृप, जायन्टस सहेली व के.डी गावीत हायस्कुल ,दरा यांच्या संयुक्त विद्यमाने चिचलाबारी ,दरा ता शहादा येथे एक हजार केतकी कंदांची लागवड करण्यात आली. लागवडीचा शुभारंभ युवा नेते मयुर दिपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.या प्रसंगी वन क्षेत्रपाल चारुशीला काटे यांनी केतकी लागवडीने माती व पाणी संवर्धनाचे काम होईल असे प्रतिपादन केले. जान्टस फेडरेशन अध्यक्षा यांनी बालपणातील वृक्ष लागवडीने पर्यावरणा प्रती कृतज्ञताभाव वाढीस लागेल असे मनोगतात सांगितले.
शहादा खरेदी विक्री संघाचे संचालक गणेश पाटील हे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते.वनसेवक मंगेश वळवी यांनी पर्यावरणावरील कविता सादर केली.महाराष्ट्रातील दुसरी
लोक जैवविविधता नोंदवही (PBR) तयार करणारे स्व. करमसिंग पवार यांच्या स्मृतींना या प्रसंगी अभिवादन करण्यात आले. या मोहिमेत एक हजार केतकी कंदांची लागवड केली गेली.
जि.प. शाळा व के डी गावित हायस्कुलच्या विद्यार्थ्यांना फळे व बिस्कीटांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्र संचालन जायन्टस गृप शहादाचे अध्यक्ष व जलप्रेमी प्रा. डाॅ. एच. एम. पाटील यांनी केले. आभार मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी मानले.कार्यक्रमासाठी जायन्टस सहेली अध्यक्षा अरुणा पाटील,वंदना गुरुबक्षाणी, बतुल बोहरी,श्री.शेप, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदिंनी संयोजन केले.








