नंदूरबार l प्रतिनिधी
प्रकाशा ते विंचूर (नाशिक) रस्त्यावरील नगाव ता. नंदुरबार ते वडबारे दरम्यान रेल्वेचे गेट नंबर ९५ कायमस्वरूपी बंद होत असून, त्याऐवजी भुयारी रस्ता करण्यात येणार आहे मात्र गेट नंबर ९५ ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी भुयारी रस्ता करण्याची परिसरातील ग्रामस्थ व अक्राळे, नगाव, तीसी गावातील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत.९५ नंबरचे रेल्वे गेट आहे, त्याच ठिकाणी हे गेट राहिले तर गेटच्या ठिकाणीच भुयारी रस्ता झाला तर सोयीचे होईल. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी बाजूला नाला असल्याने भुयारात पाणी थांबणार नाही काही ते पाणी नाल्यात सहज जाईल. कोणत्याही प्रकारे अडथळा न होता रहदारी कायमस्वरूपी सुरू राहील. बैलगाडी व इतर येणारा जाणाऱ्यांना सोयीचे होईल. हे गेट इतरत्र ठेवले तर रात्री येणाऱ्या जाणारा वाहनाना चोरांचा त्रासही संभवतो .
व सीजन मध्ये भरलेले बैलगाडी येण्या जाण्यास शेतकऱ्याला त्रास होईल व भुयारी इतरत्र हलवले तर पावसाळ्यात भुयारी जवळ पाण्यास. नीचरासाठी जागा नसल्याने भुयारीत पाणी साचून रस्ता बंद होईल. त्यामुळे गेट क्रमांक ९५ हे जेथे आहे तेथेच भुयारी रस्ता दुहेरी रस्ता बनवावा अशी परिसरातील वाहनधारक व शेतकऱ्यांची मागणी आहे या रस्त्याने धुळे कडे जाण्यासाठी जवळचा रस्ता असल्याने प्रकाशा विखरं, खोंडामळी, विखरण आदी ४०ते ५० गावातील खाजगी वाहन या वाहने व शेतकरी या रस्त्याचा वापर करतात








