नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील ठाणे पाडा ग्रामपंचायतीच्या विद्यमान कार्यकारिणीता एक वर्ष पूर्ण झाल्याने वर्षपूर्ती सोहळा पार पडला. या सोहळ्यात तलाठी कार्यालय , वाचनालय दुरुस्ती (नूतनीकरण) कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्या हस्ते झाले.
जि.प.प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस सुहास नाईक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच विशाल पवार यांनी वार्षिक कामकाजाचा आढावा सादर केला. नाशिकचे दिपक देठे यांनी सामाजिक विषयावर विनोदी प्रबोधन केले, यावेळीवेळी जि.प. सदस्य देवमन पवार होते ग्रामपंचायतीच्या वर्षभराच्या कार्याचा गौरव करून ग्रामस्थांना वार्षिक कार्याचे सादरीकरण केल्याबद्धल लोकनियुक्त सरपंच विशाल यशवंत पवार यांचे कौतुक केले.
ग्रामपंचायतीने वर्षभरात केलेले यांनी कामकाज राजीव गांधी भवन वास्तुचे नूतनीकरण, समाजमंदीर दुरुस्ती ३१ ब्रास पेवर ब्लॉक बसविले, नवीन गटार व दुरुस्ती,साउंड सिस्टम, वृक्षारोपण श्रमदानासह, चौक नामफलक, तलाठी कार्यालय व वाचनालय इमारत नूतनीकरण, आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर, सामाजिक संस्थेमार्फत शेतकरयांना विविध स्वरूपात सहाय्य व विधवा, विधुर, दिव्यांग यांना ब्लैक्ट वाटप करण्यात आला.








