नंदुरबार l प्रतिनिधी
नंदनगरीवरील पाण्याचे संकट आणि शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच माळेला ग्रामदैवत खोडियार मातेला साकडे घातले आहे.
नवरात्र उत्सवाला चैतन्यमय व मोठ्या उत्साहात रविवारी प्रारंभ झाला. सकाळी ११ वाजता शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांसमवेत ग्रामदैवत खोडियार मातेचे दर्शन केले.
जिल्ह्यात यंदा कमी पर्जन्यवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे आहे. रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांची भरभराट व्हावी तसेच नंदनगरीच्या जनतेवर आलेले पाण्याचे संकट दूर कर अशी प्रार्थना करीत माजी आ.रघुवंशी यांनी खोडियार माता चरणी साकडे घातले. याप्रसंगी उद्योजक मनोज रघुवंशी,शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, डॉ.तुषार रघुवंशी, कु.थिया रघुवंशी,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वकील पाटील, माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे,जि.प सदस्य देवमन पवार, शेतकी संघाचे चेअरमन बी.के पाटील,माजी नगरसेवक रवींद्र पवार,अभियंता किरण तडवी उपस्थित होते.








