नंदूरबार l प्रतिनिधी
लाखो भक्तांचे श्रद्धास्थान दिल्या आणि नंदुरबारचे ग्रामदैवत खोडाई मातेचा यात्राला उत्सवाला सुरवात झाली असून, जिल्ह्यातील संकट दूर व्हावे यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांनी साकडे घातले. खोडाई मातेच्या यात्रेला महाराष्ट्र सोबतच शेजारील असलेल्या गुजरात आणि मध्य प्रदेश मधून देखील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान येत असतात.

नवरात्रीचे नऊ दिवस हे महिलांसाठी अतिमहत्त्वाचे असतात तर नवरात्रीचे नऊ दिवस वेगवेगळ्या रंगांनी ओळखला जात असतो आजपासून नवरात्राला सुरुवात झाली असून आजचा कलर नारंगी होता.नारंगी रंगाची साडी घालीत जिल्ह्यातील संकट दूर व्हावे यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांनी देवीला साकडे घातले.








