शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा येथील राष्ट्रीय सेवा योजना – रेड रिबन क्लब तर्फे ग्रामीण रुग्णालय, शहादा यांच्या सौजन्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या आयुष्यमान भारत अभियानाचे ब्रीद ‘निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ नुसार राज्यभरात डिसेंबर पर्यंत 18 वर्षावरील पुरुषांची आरोग्य तपासणी शिबिरे राबविली जात आहेत. त्या अनुषंगाने ग्रामीण रुग्णालय शहादा येथील वैद्यकीय तपासणी पथकाने पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी केली.
त्यात रक्तदाब, सिकल सेल आदी परीक्षण करून कौटुंबिक पार्श्वभूमीवर आधारित आजार याविषयी तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी समुपदेशन केले. तपासणी शिबिरात 55 व्यक्तींची सिकल सेल तपासणी केले असता 1 विद्यार्थ्यास पुढे संदर्भित केले आहे. एकूण 312 व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली त्यात 215 पुरुष व 97 महिला समाविष्ट आहेत. त्यापैकी 15 पुरुष व 5 महिलांना पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात संदर्भित करण्यात आले आहे. आरोग्य शिबिराचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. आर. एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
मंडळाचे समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील, प्राचार्य प्रा. डॉ. आर.एस. पाटील, ग्रामीण रुग्णालय, शहादा च्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरस्थळी आरोग्य पथकात शहादा विभागीय अधिकारी डॉ. विनोद बाविस्कर, डॉ. जितेंद्र भंडारी, डॉ. राकेश पाटील, डॉ. कल्पना भंडारी, डॉ. उज्वला भामरे, डॉ. चेतना पाटील हे वैद्यकीय अधिकारी व औषध निर्माण अधिकारी पावन चौधरी, भगत वसावे, अजय सोनवणे, मयूर निकुंभ आणि सहाय्यक परिचारिका शितल राठोड, अनिता भंडारी व भाग्यश्री सोनार आदी उपस्थित होते. पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील, प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील, उपप्राचार्य डॉ. एम. के. पटेल, डॉ. एस. डी. सिंदखेडकर यांचे शिबिराच्या नियोजनासाठी मार्गदर्शन लाभले. रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. वर्षा चौधरी, डॉ. वजीह अशहर व रासेयो स्वयंसेवकांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.








