नंदुरबार l प्रतिनिधी
येथील सामाजिक कार्यकर्ते दिग्विजय राजपूत यांना अन्न सुरक्षा योजनेतून मिळणारे रेशन बंद करून ते गोर गरीब जनतेस देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
दिग्विजय राजपूत यांनी तहसिलदार नितीन गर्जे यांना तसे निवेदन सादर केले आहे.
नंदुरबार येथील स्वस्त धान्य दुकानदार एस.व्ही.चौधरी यांच्या रेशन दुकानाला जोडले असून ती शिधापत्रिका प्राधान्य कुटूंब लाभार्थी मध्ये समाविष्ट असल्याने ती शिधापत्रिका बंद करण्यात यावी, राजपूत यांनी अन्न सुरक्षा योजनेतून माघार घेतली असून त्यांना मिळणारे स्वस्त धान्य हे गरीब जनतेला देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तहसिलदार नितीन गर्जे यांना निवेदन देतेवेळी पुरवठा निरीक्षक अधिकारी रमेश वळवी उपस्थित होते.








