नंदुरबार l प्रतिनिधी

महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांमधुन उत्कृष्ट काम करणा-या तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे आदर्श बँक विषयीचे आर्थिक निकष पूर्ण करणा-या बँकांना दि. महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशन लि. मुंबई यांचाकडुन पुरस्कार दिला जातो. नंदुरबार येथील श्री. गोवर्धनसिंह रघुवंशी सहकारी बँक लि.नदुरबार यांना 100 कोटीच्या आंत ठेवी असलेल्या बँक गटात व्दितीय क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार देऊन सन्मान करण्यांत आला.
सदरचा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच मुंबई येथे फेडरेशनचे अध्यक्ष व जेष्ठ सनदी लेखापाल अजयकुमार ब्रम्हेचा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सदरचा पुरस्कार बँकेचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज गोवर्धनसिंह रघुवंशी, बॅकेच्या संचालिका भगवती रघुवंशी, संचालक भारती रघुवंशी, संचालक राहुल पाटील, निलेश सोनार, अब्दुल गनी, जामसिंग गिरासे तसेच बँकेचे जनरल मॅनेजर अंकलेश शाह व असि. जनरल मॅनेजर भरत पाटील,व अधिकारी राजेंद्र कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्विकारला.
बँकेने सलग तिस-यादा पुरस्कार मिळविला असुन ग्राहक सेवेच्या विविध योजना तसेच ग्राहकांना किफायतशीर दराने कर्ज पुरवठा उपलब्ध करुन दिला जात असुन
ग्राहकांनी बँकेच्या प्रती विश्वास दाखविल्याबाबत आभार व्यक्त केले आहे.









