Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा नगरपालिका कारभारावर नाराजी व्यक्त करत सभापतींनी दिले प्रशासनाला निवेदन

team by team
October 2, 2021
in राजकीय
0
तळोदा नगरपालिका कारभारावर नाराजी व्यक्त करत सभापतींनी दिले प्रशासनाला निवेदन
तळोदा l प्रतिनिधि
येथील प्रभाग क्रमांक 3 मधील (कोल्ली हट्टी) येथे महिन्या भरापासून लाईट बंद असल्याने लवकरात लवकर काम पूर्ण करावे व संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, असे सभापती बेबीबाई पाडवी यांनी सांगितले असून आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबतचे  मुख्याधिकारी नगरपरिषद यांना निवेदन  दिले आहे.
सत्ताधारी नगरसेवक यांनी लेखी निवेदन दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून न. प. च्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
     या निवेदनात म्हटले आहे संबंधित कार्यालयांचे अधिकारी सचिन पाटील तसेच ठेकेदार गणेश पाटील व त्यांच्या सोबत पाहणारी सर्व टीम वारंवार तक्रार करून देखील संबंधित ठेकेदार, कर्मचारी, अधिकारी यांना मागील एक महिन्यापासून बेबीबाई पाडवी सभापती आरोग्य विभाग प्रभाग क्र 3 च्या नगरसेविका स्वतः तोंडी व मोबाईलद्वारे तक्रार करून सुद्धा माझ्या प्रभागातील कामाची दखल घेतली नाही.माझ्या प्रभाग आदिवासीबहुल असल्या कारणाने काम होत नाही का? व तेथे पावसाळ्यात वारंवार पूरग्रस्त स्थिती निर्माण होते तेथे वारंवार साप, सर्प, विंचू , बिबट इत्यादी जीवघेणे प्राणी आढळतात यासंबंधी माहिती सार्वजनिक असताना सुद्धा संबंधित ठेकेदार, अधिकारी, कर्मचारी यांनी माझ्या प्रभागात कामाची दखल घेतली नाही व काम केले नाही याच्यात कधी रात्रीच्या अंधारात जीवित हानी झाली तर याची पूर्ण जबाबदारी ठेकेदार, कर्मचारी, अधिकारी यांची राहील
      तसेच संबंधित खान्देश युवक सुशिक्षित बेरोजगारांची स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्यादित शिरपूर जिल्हा धुळे यांना दि. 1 जून 2021 पासून ठेका अदा करण्यात आला आहे. मागील चार महिन्यात संबंधित संस्था, ठेकेदाराने अद्याप पावेतो संपूर्ण मनुष्यबळ अथवा कर्मचारी नेमलेले नाहीत  यामुळे संपूर्ण शहरात या कामाबाबत तक्रारी वाढत आहेत आणि नगरसेवकांना जनतेकडून जाब विचारण्यात येत आहे.
     तरी मुख्यअधिकारी व नगराध्यक्ष यांना विनंती की संबंधित ठेकेदार, संस्था यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे व या ठेकेदाराची बिल अदा करू नये व संबंधित अधिकारी यांना याबाबत जाब विचारून माझ्या प्रभागातील काम लवकरात लवकर करण्यात यावे अन्यथा मी व माझे सहकारी नगरसेवक मुख्याधिकारी यांच्या दालनात उपोषणास बसू निवेदनावर रामानंद ठाकरे, योगेश पाडवी सुरेश पाडवी, सविता पाडवी, गौरव वाणी, महिला व बालकल्याण सभापती शोभा भोई, सुरेश पाडवी अमोन्नोदिन शेख यांच्या सह्या आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

आहारात रानभाज्यांचा समावेश केल्यास कुपोषणाची़ समस्या दूर होण्यास होणार मदत : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नंदुरबारला स्वच्छ परिसराचे आयोजन

Next Post
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नंदुरबारला स्वच्छ परिसराचे आयोजन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नंदुरबारला स्वच्छ परिसराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयाचा अभ्यास दौरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयाचा अभ्यास दौरा

February 2, 2026
डॉ.विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा जंबो स्वरूपात क्रीडा स्पर्धा होणार,विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीचे समस्त क्रीडापटूंना आवाहन

भारत बनतोय जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था : माजी खा.डॉक्टर हिना गावित

February 2, 2026
अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

February 2, 2026
नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

February 2, 2026
नंदुरबार जिल्हाविकासाला हातभार लावणारे कणखर नेतृत्व हरपले : माजी खा. डॉ. हिना गावित

अजितदादांचा अस्थिकलश उद्या नंदुरबारात जिल्हावासीयांना घेता येणार दर्शन

February 2, 2026
अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

January 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add