Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सीएमपी प्रणालीने वेतन अदा प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला यश

team by team
October 7, 2023
in राज्य
0
सीएमपी प्रणालीने वेतन अदा प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला यश

नंदुरबार l प्रतिनिधी

 

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे मासीक वेतन देयके शालार्थ प्रणाली वरून तयार करुन शिक्षण विभागाला प्राप्त झाल्यानंतर कोषागाराला देयके पाठवुन वेतनानुदान जिल्हा निधीला प्राप्त होते.

 

 

त्यानंतर वित्त विभाग गट विकास अधिकारी (पंचायत समिती) खात्यावर निधी वर्ग करुन वित्त विप्रषन पाठवतात या सर्व प्रक्रीयेसाठी लागणारा कालावधी व त्यासाठीचे मनुष्यबळ विचारात घेता शिक्षकांचे वेतन दर महिन्याला १५ ते २० दिवस विलंबानेच होत आहेत. नंदुरबार जि.प. मधिल शिक्षकांचे वेतन दि.६ जमा करण्यात आले आहे.

 

 

 

शिक्षकांनी विविध वित्तीय संस्थांचे कर्ज घेतलेले असल्याने त्यांचे परतफेडीचे हप्ते विलंबाने संस्थाना पोहचत असल्याने मासीक व्याजा सोबतच दंडनिय व्याज सहन करावे लागत असुन वित्तीय संस्थाना याचा फायदा होत आहे. त्यामुळेच वेतनासाठी शिक्षकांची ओरड ऐकायला मिळते व नाहक शिक्षकात असंतोष निर्माण झाला होता वस्तुस्थिती आहे.

 

 

 

अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा वेतनाचा प्रश्नाचे निवेदन महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे नंदुरबार जिल्हा मार्गदर्शक संजय गावित, जिल्हा अध्यक्ष गोपाल गावित, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांच्या शिष्टमंडळांनी नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या संसदरत्न खा. डॉ. हिना.गावित, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू मंत्री दर्जा अध्यक्ष दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्य मुंबई, राधाकृष्ण गमे विभागीय आयुक्त नाशिक कार्यालय नाशिक, सुधीर खांदे अप्पर निवासी उपजिल्हाधिकारी तथा विशेष कार्यकारी अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार, नंदुरबार पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, नंदुरबार शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, शिक्षण सभापती गणेशदादा पराडके, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण देवरे , प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी वंदना वळवी, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण,महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटना राज्याध्यक्ष विकास घुगे यांना निवेदनाव्दारे देण्यात आले होते.

 

 

 

 

शिक्षकांच्या वेतनासाठी ऑनलाईन सीएमपी प्रणालीचा अवलंब झाल्यास शिक्षकांना नियमीत १ तारखेला वेतन अदा होण्यात कोणतीही अडचण राहणार नाही. अशी प्रहार शिक्षक संघटनेची धारणा होती. ज्याप्रमाणे जालना, उस्मानाबाद या जिल्हापरिषद मध्ये सीएमपी प्रणाली द्वारे वेतन अदा केले जाते. त्याप्रमाणे नंदुरबार जिल्हा परिषदेने सीएमपी प्रणालीचा अवलंब करावा. नंदुरबार शिक्षण विभागाचे शिष्टमंडळ जालना येथे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलेले होते. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या वेतनासाठी सीएमपी ऑनलाईन प्रणाली लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेची नंदुरबार जिल्हाध्यक्ष यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद नंदुरबार येथे तुरवाद्य आंदोलन करण्यात आलेले होते.

 

 

 

 

आंदोलनाची दखल घेत सीएमपी प्रणाली लागू करण्यासाठीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले होते. अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न सीएमपी ऑनलाईन प्रणाली लागू झाल्यास महिन्याच्या १ तारखेलाच शिक्षकांना वेतन अदा करावे असे निवेदनात म्हटले होते. कर्तव्यदक्ष अधिकारी सीईओ सावनकुमार यांनी प्रहार शिक्षक संघटनेला आश्वासन दिल्याप्रमाणे सीएमपी प्रणाली तात्काळ लागू करण्यात येईल यासाठी एक महिन्याचा कालावधी लागेल असेही आश्वासन देण्यात आले होते. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा अदा करण्यासाठी सीएमपी प्रणालीचा वापर केला जाणार आहे. जि. प. कर्मचारी यांचा पगार खात्यात जमा होण्यासाठी विविध प्रक्रियांचा अवलंब करावा लागतो त्यामुळे पगार खात्यात जमा होण्यास मोठा विलंब होतो.

 

 

 

 

त्यामुळे आता सीएमपी प्रणालीद्वारे पगार थेट खात्यात जमा केला आहे. शिक्षक, कर्मचार्‍यांचे श्रम व वेळेची बचत होते. यावेळी कर्मचाऱ्यांचे वेतन सीएमपी मार्फत करण्यात येणाऱ्या अडचणी जाणून घेणे व त्या दूर करण्याचा प्रयत्न करणे, सीएमपी मार्फत वेतन काढण्यासाठी वरिष्ठांकडून मिळालेल्या माहितीचे पालन करणे, सर्व कर्मचाऱ्यांचे बँक खाते क्रमांक असल्याची खात्री करणे. आणि आय एफ एस सी अनुक्रमांक अद्ययावत करणे इत्यादी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांनी सांगितले की, शिक्षकांच्या पगाराला उशीर होणार नाही. शिक्षणाधिकाऱ्यांनी पगाराची प्रक्रिया सीएमपी मार्फत उपलब्ध करून दिली जाईल असे सांगितले. महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने प्रशासनाचे आभार मानण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

एस.ए.मिशन हायस्कूल येथे वन्यजीव सप्ताह साजरा

Next Post

नंदुरबारात आज १६ वी राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन

Next Post
नंदुरबारात आज १६ वी राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन

नंदुरबारात आज १६ वी राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add