नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस सेवा दल व नंदुरबार शहर काँग्रेस कमिटीतर्फे हाट दरवाजा येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन तसेच माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमापुजनाने अभिवादन करण्यात आले.
यावेळी किसान काँग्रेसचे राज्य सचिव देवाबापू चौधरी, नंदुरबार जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष एजाज बागवान, सामाजिक कार्यकर्ते अरुण चौधरी, नंदुरबार शहर काँग्रेस कमिटीचे सदस्य सईद बागवान, काँग्रेस सेवा दलाचे बाबुलाल बोरसे, नंदुरबार शहर मुस्लिम समाजाचे पंच शाबीर मन्यार, काँग्रेस सेवा दलाचे जुम्मा पठाण आदींची उपस्थिती होती.
यावेळी महात्मा गांधी यांच्या स्वच्छ भारत संकल्पनेविषयी घोषणा देण्यात आल्या. उपस्थितीतांनी स्वच्छता अभियानाविषयी मार्गदर्शन केले. यानंतर काँग्रेस सेवा दलाच्या कार्यालयात भारताचे दुसरे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पुजनाने त्यांना अभिवादन करण्यात आले.








