Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एकाच वेळी 13 वेगवेगळ्या गावांमधील विविध विकास कामांचा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी धडाकेबाज पद्धतीने केला शुभारंभ

team by team
October 3, 2023
in राजकीय
0
एकाच वेळी 13 वेगवेगळ्या गावांमधील विविध विकास कामांचा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी धडाकेबाज पद्धतीने केला शुभारंभ

नंदुरबार l प्रतिनिधी

महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी एकाच दिवसात नंदुरबार तालुक्यातील 13 वेगवेगळ्या गावांमधील विविध विकास कामांचा धडाकेबाज पद्धतीने शुभारंभ केला. पालकमंत्री नामदार डॉक्टर गावित यांनी या विविध विकास कामांना पूर्वीच मंजुरी मिळवलेली होती तथापि त्यातील काहींचे भूमिपूजन, उद्घाटन आणि काही कामांचे लोकार्पण एकाच दिवसात पार पडले.

 

 

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या तथा खासदार संसद रत्न डॉ. हिना गावित आणि जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. गावांना विकास निधी मिळवून देण्यात पालकमंत्री यांच्या बरोबरीने भूमिका घेत असल्यामुळे डॉ. हिना गावित आणि डॉ. सुप्रिया गावित यांचे देखील प्रत्येक गावात ग्रामस्थांनी वाजत गाजत स्वागत करून सत्कार केला.जि.प.सदस्य शांताराम पाटिल भाजपा तालुकाध्यक्ष जितेन्द्र पाटिल प.स.सदस्य मंगल भिल यांच्यासह विविध गावांचे सरपंच,उपसरपंच व सदस्य आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

1 आक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत पार पडलेल्या या कार्यक्रमांत दरम्यान नाशिंदे आणि खोंडामळी या दोन ठिकाणी छोटेखानी सभा पार पडल्या तर अन्य सर्व ठिकाणी कोपरा सभेच्या माध्यमातून जनसंवाद करण्यात आला. त्याप्रसंगी अनेक ग्रामस्थांनी पालकमंत्री यांच्या समोर आपल्या विविध समस्या मांडल्या. मागील त्याला योजनेचा लाभ दिला जाईल तसेच प्रत्येक बेघराला घरकुल दिल जाईल त्याचबरोबर लवकरच गाय बकरी आणि कोंबड्या वाटपाचा शुभारंभ केला जाईल, अशा शब्दात पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी त्या ग्रामस्थांना आश्वस्त केले.

 

 

 

कोणत्याही जाती जमातीचा व्यक्ती असो, घरकुल, शौचालय, गॅस आणि तत्सम सुविधांपासून वंचित राहू नये हा महाराष्ट्र शासनाचा निर्णय झाला आहे. त्याचबरोबर प्रत्येक गाव पाडा रस्त्याने जोडला जावा आणि घराघरात पाणी मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असून रस्ते विकास चल मिशन योजना आणि घरकुल योजना यांचा जास्तीत जास्त लाभ लोकांपर्यंत पोहोचवला आहे; तथापि योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व वंचित घटकांनी पुढे यावे; असे आवाहन महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्हा पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी या उद्घाटन व भूमिपूजन प्रसंगी केले.

 

एकाच दिवसात 13 गावांमधील या कामांचा केला शुभारंभ

यात नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी जिल्हा परिषद गटातील गावांचा समावेश होता. खोंडामळी गावात रस्त्यांच्या भूमिपूजना सह सुमारे तीन कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. भालेर गावात कॉक्रीट रस्ता, भालेर कोपर्ली रस्ता, राज्यसिमा सावळदे-कोरीट-रनाळा-शनिमांडळ रस्ता याचे भुमीपुजन, नगाव येथे कॉक्रीट गटारीचे भुमीपुजन, मौजे शिंदगव्हाण ता. जि नंदुरबार येथे 2515 अंतर्गत कॉक्रीट रस्त्याचे उदघाटन, शिंदगव्हाण येथे ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत भुमीपुजन, काकर्दे गावात कॉक्रीट रस्ता व गटारीचे भुमीपुजन, नंदुरबार – भालेर कोपर्ली रस्ता, जुनेमोहिदे गावात कॉक्रीट रस्ता व गटारीचे भुमीपुजन, कोळदा खोंडामळी कोपर्ली रस्ता, हाटमोहिदे गावात कॉक्रीट रस्ता व गटारीचे भुमीपुजन, ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत पेव्हर ब्लॉकचे भुमीपुजन, बोराळे गावात स्थानिक विकास निधी अंतर्गत गुजर समाज वस्तीमध्ये समाज मंदिराचे भुमीपुजन,सुजालपुर गावात ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत पेव्हरब्लॉकचे भुमीपुजन, कोरीट गावात ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत पेव्हरब्लॉकचे भुमीपुजन ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरणाचे भुमीपुजन,

 

 

 

बामडोद रस्ता सुधारणा करणे कामाचे भुमीपुजन, खोंडामळी येथे सुजालपुर ग्रामा-225 ची सुधारणा करणे कामाचे भुमीपुजन, राज्यसिमा सावळदे – कोरीट-रनाळा-शनिमांडळ (रामा-7) रस्ता मध्ये विखरण येथे कोक्रट ग भुमीपुजन करणे, विखरण येथे ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत पेव्हरब्लॉकचे भुमीपुजन करणे, नाशिंदे गावात आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण आणि ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत पेव्हर ब्लॉकचे भुमीपुजन यासह विविध विकास कामांचा धडाकेबाज शुभारंभ पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आला.

बातमी शेअर करा
Previous Post

म. गांधी व शास्त्रींच्या जंयतीनिमित्त जिल्हा काँग्रेसतर्फे अभिवादन

Next Post

श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशनचे पुरुषोत्तम पुरस्कार चैत्राम पवार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीला जाहीर

Next Post
श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशनचे पुरुषोत्तम पुरस्कार चैत्राम पवार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीला जाहीर

श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशनचे पुरुषोत्तम पुरस्कार चैत्राम पवार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीला जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add