नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील श्री शनी तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शनीमांडळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी एक शेतकरी कुटुंबातील संतोष आत्माराम पाटील तर उपसरपंच पदी संभाजी बळीराम माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
माजी सरपंच योगेश मोरे यांच्या कार्यकाळ पूर्ण झाल्याने ही स्तुत्य निवड करण्यात आली.
ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक अधिकारी म्हणून खंदारे ,ग्रामसेवक पी.के.खरे यांच्या अध्यक्षतेखाली एक खास सभा घेण्यात आली.यावेळी ग्रामपंचायत सदस्य योगेश मोरे,निलेश मोरे,विनायक मोरे,भिलू भिल,नानाभाऊ भिल, तसेच जि प सदस्य सयाजीराव मोरे,मा.जि प सदस्य प्रवीण मोरे,अरविंद मोरे , संतोष मोरे , वसंत पाटील ,भावराव मोरे ,शातीलाल पाटील,युवराज पाटील, लक्ष्मण मोरे , जगन्नाथ पाटील, नथु मोरे, शिवाजी मोरे , सुनील मोरे , भास्कर मोरे , रमेश माळी ,शामु भिल , हिरामण भिल , सईतान्या नाईक , मधु भिल , दशरथ भिल, भिका भिल , अनिल भिल , मोग्या भिल , अजय भिल हे उपस्थित होते.यावेळी सदस्य संतोष पाटील यांचा सरपंच पदासाठी एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
एक सामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तीस आज सरपंच पदी निवड झाल्याने गावात एकप्रकारे आनंद व्यक्त करण्यात आला.त्यांचा सामूहिक सत्कार करण्यात आला.