Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी : जि .प . अध्यक्षा डॉ .सुप्रिया गावित

team by team
October 2, 2023
in राजकीय
0
स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी : जि .प . अध्यक्षा डॉ .सुप्रिया गावित

नंदुरबार l प्रतिनिधी

स्वच्छता आणि आरोग्य यांचा जवळचा संबंध आहे . स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेची सवय रुजवावी यासाठीच या पंधरवड्याचे आयोजन दरवर्षी केले जाते .स्वच्छता ही मोहीम केवळ उपक्रमापुरती मर्यादित न राहता ती लोक चळवळ व्हावी . यासाठी सर्वांनी या लोकचळवळीत सहभागी होऊन आपला गाव व परिसर कायमस्वरूपी स्वच्छ ठेवावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत यांनी केले .

देशात दि १५ सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता ही सेवा या पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे . या अनुषंगाने केंद्र शासनाच्या सूचनानुसार दि . १ ऑक्टोबर रोजी ‘एक तारीख एक तास महाश्रमदान ‘ या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . त्यानुसार कोळदा ता जि नंदुरबार येथे महाश्रमदानाची सुरुवात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ .सुप्रिया गावित यांच्या उपस्थितीत करण्यात आली . यावेळी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करित असताना त्या बोलत होत्या.

डॉ .सुप्रिया  गावित पुढे म्हणाल्या की , दैनंदिन जीवनात स्वच्छतेची सवय अंगीकारल्याने परिसरातील वातावरण प्रसन्न राहून काम करण्यास प्रोत्साहन मिळते .तसेच गाव व परिसर स्वच्छ ठेवल्याने गाव रोगराई पासून मुक्त होते . आज जिल्हाभरात स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत एकाच दिवशी जिल्हा परिषदेच्या वतीने 867 ठिकाणी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे .यात ग्रामपंचायतीतील शाळा ,अंगणवाडी , प्राथमिक आरोग्य केंद्र , या ठिकाणी सकाळी १० वाजता स्वच्छता मोहीम राबविली जात आहे .स्वच्छता मोहीम ही केवळ प्रसिद्धीसाठी उपक्रम न होता ती सवय व्हावी व यासाठी सर्वांनी दैनंदिन जीवनात स्वच्छतेचा अंगीकार करावा असे आवाहनही डॉ गावीत यांनी यावेळी केले .

यानंतर अध्यक्षा डॉ . गावित यांनी उपस्थित ग्रामस्थांना स्वच्छतेची शपथ देऊन ग्रामपंचायत व परिसरात स्वतः श्रमदान करून परिसर स्वच्छता केली . यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ मोहिनी वळवी ,उपसरपंच आनंद गावित ,पंचायत समिती सदस्य कालसिंग दादा, ग्राम विकास अधिकारी संजय देवरे ,सर्व ग्रामपंचायत सदस्य ,शिक्षक ,शासकीय कर्मचारी , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

बातमी शेअर करा
Previous Post

स्वच्छता हे राष्ट्रीय आचरण बनले; स्वच्छ भारत अभियान घराघरात पोचले :डॉ. विजयकुमार गावित

Next Post

शनिमांडळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी संतोष पाटील यांची बिनविरोध निवड

Next Post
शनिमांडळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी संतोष पाटील यांची बिनविरोध निवड

शनिमांडळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी संतोष पाटील यांची बिनविरोध निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add