खापर l प्रतिनिधी
महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमा वरती भागात असलेल्या सागबारा तालुक्यातील सेलंबा या गावात विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने काढण्यात आलेल्या शौर्य जागरण मिरवणुक यात्रेत दगळफेक झाल्याची घटना काल (ता.२९) रोजी सकाळी साडेदहाच्या दरम्यान घडली आहे.
या घटनेत दहा ते अकरा जणांना दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली व नियंत्रणानंतर तणावपूर्ण शांतता आहे.
विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्यावतीने दक्षिण गुजरात शौर्य जागरण यात्रा निमित्त कुयदा या परिसरातुन सेलंबा या गावात (ता.२९) सकाळी साडेदहाच्या सुमारास मिरवणूक दाखल होत असतांना येथील अल्पसंख्याक प्रार्थना स्थळाजवळ मिरवणूक रथावर काही समाज कंटकाकडुन दगळफेक झाली.ज्याचे रूपांतर दोन समुदायात धुमश्चक्रीत झाले.याघटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही,
परंतु दहा ते बारा जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.तसेच एका कटलरी व स्टेशनरी दुकानाची जाळपोळ झाल्याने दुकानातील माल जळून खाक झाले तर टेलरींग,मोबाईल,फळे आदी दुकानांचे नुकसान झाले आहे.पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला व तणावपूर्ण शांतता आहे.घटने मागील दोषींचा तपास सुरू आहे.व अफवांवर विश्वास न ठेवण्याचा नर्मदा पोलीस अधीक्षक प्रशांत सुंबे व सागबारा पोलीस उपनिरीक्षक पी.व्ही.पाटील यांच्याकडुन करण्यात येत आहे.
सेलंबा येथे निघालेल्या विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने आयोजित शौर्य जागरण यात्रा मिरवणुकीत काही समाज कंटकाकडुन दगळफेक करण्यात आली,त्यामुळे दोन समुदायात तणावाचे वातावरण निर्माण झाले.घटनेस्थळी स्थानिक पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून तणावपूर्ण शांतता आहे.घटनेत जाळपोळ व तोडफोड झालेल्या दुकानांचे पंचनामे करत आहे,घटने मागील दोषींचा शोध घेण्यात येत आहे. दोषींवार योग्य ती कारवाई करण्यात येईल.
प्रशांत सुंबे,
पोलीस अधीक्षक जिल्हा नर्मदा (गुजरात)
गुजरात राज्यातील सेलंबा हे गाव महाराष्ट्र सीमेलगत असल्याने अफवांना बळी पडून त्यांचे पडसाद अक्कलकुवा तालुक्यात उमटू नये म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे व पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार घडूनये म्हणून चोख बंदोबस्त तैनात केला आहे.