नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील ठाणेपाडा येथील जि.प.शाळेत विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद दिसत होता.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोेरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा सचिव जितेंद्र कोकणी तथा नवयुवक गणेश मित्र मंडळ ठाणेपाडा यांच्यातर्फे ठाणेपाडा जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त अधिकारी वर्ग-१ वाय.एम.पवार तर प्रमुख अधिकारी म्हणून माजी सैनिक मधुकर महाले हे उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणपत पवार व मुख्याध्यापक प्रकाश लांबोळे यांनी जितेंद्र कोकणी यांचा सत्कार केला व आभार मानले. सूत्रसंचालन भगवान व्यवहारे यांनी केले. तर आभार बाबुराव चौरे यांनी मानले.








