नंदुरबार l प्रतिनिधी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडीया योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील १८ वर्षावरील नवउद्योजकांना मार्जिन मनी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळवले आहे.
या योजनेत राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र १८ वर्षांवरील नवउद्योजक यांना १० टक्के स्वत:चा हिस्सा भरणा केल्यानंतर व राष्ट्रीयकृत बँकेने अर्जदारास स्टैंड अप इंडिया योजनेअंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रंट एंड सबसिडीच्या अनुषंगाने प्रकल्प मूल्याच्या १५ टक्के अनुदान राज्य शासनामार्फत देण्यात येईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील इच्छुक अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजकांनी समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा असेही आवाहन सहाय्यक आयुक्त श्री. वसावे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.








