नंदुरबार l प्रतिनिधी
केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांचेमार्फत माजी सैनिक, विधवांचे पाल्य यांच्यासाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत असून या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरु असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
माजी सैनिक विधवांचे पाल्य इयत्ता १२ वी, डिप्लोमा व पदवीपरीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत व त्यांनी अभियांत्रिकी, बी टेक, एमबीबीएस, बीडीएस, बीएड, बीबीए, बी फार्मा, बीसीए, एमबीए आणि एमसीए इत्यादी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला आहे,
अशा पाल्यांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्ती अभ्यासक्रमाची यादी व अर्ज केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्या www.ksb.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून संबंधितांनी त्यांच्या पाल्यांचे अर्ज ३० नोव्हेंबर २०२३ पुर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे सादर करावेत.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे दूरध्वनी क्रमांक ०२५६२- २३७२६४ यावर संपर्क साधावा असेही श्री. पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.








