नंदुरबार l प्रतिनिधी
जागतिक औषध निर्माता दिनानिमित्त नंदुरबार तालुका विधायक समितीच्या औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय तर्फे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखऊन जनजागृती रॅली शहरातील विविध भागातून काढण्यात आली. रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी औषधांच्या डोस व त्याचे दुष्परिणाम याविषयी पथनाट्याचे सादरीकरण केले.
नंदुरबार येथील तालुका क्रीडा संकुल पासून रॅलीला सुरुवात झाली. स्टेशन रोड, अंधारे चौक, जीटीपी महाविद्यालय मार्गे औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या आवारात रॅलीच्या समारोप करण्यात आला. रॅलीच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृतीसाठी चौका-चौकात औषधांचे दुष्परिणाम, औषधांचे डोस, पेशंट काऊन्सिलींग व अंधश्रध्दा निर्मुलन ह्या विषयावर पथनाट्य विद्यार्थ्यांनी सादर केले. रॅलीच्या मार्गावरील मेडिकलमध्ये जाऊन संस्थेचे चेअरमन तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी,उपाध्यक्ष मनोज रघुवंशी,विनय श्रॉफ व विद्यार्थ्यांनी शुभेच्छापत्र व पुष्प देऊन दुकानदारांच्या सत्कार केला.
या कार्यक्रमास नंदुरबार तालुका विधायक समितीचे उपाध्यक्ष मनोज रघुवंशी, विनय श्रॉफ, जिल्हा केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शर्मा,संस्थेचे समन्वयक डॉ.महेंद्र रघुवंशी,महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती वैशाली शेवाळे व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.








