खापर l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथे अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देण्याचा डाव फसला, हृदयाचा ठोका चुकवणारी घटना (ता.२३)गुरुवार रोजी तालुक्यात घडली आहे. खेळण्या, शिकण्याच्या वयात संसाराची पुसटशी कल्पनाही नसलेल्या १४ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देण्याचा निर्दयी प्रयत्न करण्यात येत होता.मात्र सोरापाडा येथील राजू पाडवी यांच्या फिर्यादीवरून हा बालविवाह थांबविण्यात पोलिसांना यश आले आहे.
तालुक्यातील सोरापाडा येथील बेबीबाई पाडवी, प्रदीप पाडवी रा.सोरापाडा, अली हुसेन बोहरी रा.खापर,रशिदा फिरोज बोहरी रा.खापर,आयशा अशपाक मक्राणी रा.कोराई यांनी अल्पवयीन मुलीचे लग्न करणे हे कायद्याने गुन्हा आहे हे माहिती असून देखील अली हुसेन फिरोज बोहरी रा.खापर याच्याशी लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला,
मात्र सोरापाडा येथील सुजाण नागरिक राजू पाडवी यांच्या फिर्यादीवरून बेबीबाई पाडवी रा.सोरापाडा, प्रदीप पाडवी रा.सोरापाडा, अली हुसेन बोहरी रा.खापर, रशिदा फिरोज बोहरी रा.खापर,आयशा अशपाक मक्राणी रा.कोराई या पाच जणांवर अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुरनं.४९७/२०२३ बाल विवाह प्रतिबंध कायदा कलम ११ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्यांचा पुढील तपास पोलिस निरीक्षक दिपक बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.संजय जाधव करीत आहे.








