नंदुरबार l प्रतिनिधी
स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत अक्राणी तालुक्यातील तोरणमाळ या पर्यटनस्थळाची श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली . तसेच स्वच्छता रन , निबंध स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांचा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक एम .डी . धस , गटविकास अधिकारी सी .टी .गोस्वामी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला .
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ .सुप्रिया गावित , मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात 15 सप्टेंबर 2023 पासून स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत विविध उपक्रम सुरू आहेत . या उपक्रमात ग्रामपंचायतस्तरावर श्रमदानातून परिसर स्वच्छता , शालेयस्तरावर विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात येवून ग्रामस्थांमध्ये स्वच्छताविषयक जनजागृती करण्यात येत आहे.
स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत आज दि. 23 सप्टेंबर 2023 रोजी तोरणमाळ येथे प्रकल्प संचालक एम.डी . धस , गट विकास अधिकारी सी . टी गोस्वामी यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी श्रमदानातून ठिकठकाणी स्वच्छता केली यावेळी प्रकल्प संचालक धस यांनी उपस्थित ग्रामस्थ व व्यापारी बांधव यांना स्वच्छतेची शपथ देऊन मार्गदर्शन केले . यावेळी विस्तार अधिकारी किरण गावीत , जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सुनिल पाटील , ग्रामपंचायतीचे उपसरपंच , सदस्य , ग्राम विकास अधिकारी डी डी पाटील, राजेश ब्राम्हणे , गट समन्वयक वसंत वसावे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
यानंतर आंतरराष्ट्रीय शाळेत स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत ग्रामस्थांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने स्वच्छता रन चे आयोजन करण्यात आले होते . विद्यार्थ्यांनी परिसरात रॅली द्वारे स्वच्छता विषय घोषणा देऊन जनजागृती केली . स्वच्छता रन मध्ये इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते . यानंतर प्रकल्प संचालक धस यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता शपथ देऊन मार्गदर्शन केले तसेच शाळेतर्फे स्वच्छतेवर आयोजित निबंध , चित्रकला स्पर्धेचे परिक्षण करून या स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्याचा प्रकल्प संचालक धस , गट विकास अधिकारी गोस्वामी यांचे हस्ते गौरव करण्यात आला योवळी शिक्षण विस्तार अधिकारी माळी , मुख्याध्यापक रत्नपारखी आदीसह शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते .








