नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील सोनार गल्ली भागातील श्रीमंत बाबा गणपती मंडळाजवळील बाबा गणपती बाळ गणेश मंडळातर्फे प्रतिकात्मक रथाच्या मिरवणुकीने साऱ्यांचे लक्ष वेधले.
बाळ गोपाळांसह महिलांनी सहभागी होऊन गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष केला.
जळगावकर परिवारातील अर्णव आशिष जळगावकर या विद्यार्थ्यांने पाच वर्षांपूर्वी हट्ट करून श्रीमंत बाबा गणपती मंडळाच्या रथाप्रमाणेच प्रतिरुप रथ बनवून गणरायाची प्रतिष्ठापना केली. हुबेहूब बाबा गणपती मंडळाच्या रथाचे स्वरूप साकारण्यात आले.
प्रथम टप्प्यातील गौरी गणपती विसर्जनानिमित्त शनिवारी बाबा गणपती बाळ गणेश मंडळातर्फे ढोल ताशांच्या गजरात बालगोपाळ रथ ओढून मिरवणुकीत सहभागी झाले.गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.असा जयघोष करीत परिसरातील महिलांनी देखील लाडक्या गणरायाला निरोप दिला.








