नवापूर l प्रतिनिधी
नवापुर तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा धनराट येथील इयत्ता दहावीत शिकणारा विद्यार्थ्याचा सकाळी व्यायाम करताना अचानक चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार
आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालय नंदुरबार अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतील सोळा वर्षीय विद्यार्थ्यांचा सकाळी सहा वाजेच्या सुमारास पटांगणात रनिंग करताना अचानक चक्कर येऊन खाली पडला. शालेय प्रशासनाने तात्काळ विद्यार्थ्याला आश्रम शाळेतील 108 रुग्णवाहिकेतून नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती नातेवाईकांना दिल्याने नातेवाईकांनी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात व धनराट शासकीय आश्रम शाळेत मोठी गर्दी केली व आईवडिलांनी आक्रोश केला. मयत विद्यार्थी भाऊ करज्या गावित वय 16 इयत्ता दहावी रा.भवरे, ता. नवापूर येथील रहिवाशी आहे. करज्या मोना गावीत यांना 6 मुले आहेत भाऊ गावित हा 4 नंबर चा मुलगा होता. 5 नंबरचा मुलगा देखील धनराट शासकीय आश्रम शाळेत शिकत आहे. अचानक मृत्यू झाल्याने गावित परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे संबंधित विद्यार्थ्याला आदिवासी विकास विभागाच्या नियमानुसार तात्काळ मदत मिळावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. नवापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर त्यांच्या गावी विद्यार्थ्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे घटनास्थळी नंदुरबार प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, मुख्याध्यापक, अधीक्षक उपस्थित आहे.सदर घटनेचा तपास नवापूर पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांचा मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ,पो हे का गणेश बच्छे,कैलास तावडे,नरेंद्र नाईक,नितिन नाईक, पंचनामा करीत आहे.तपास करीत आहे.