नंदुरबार l प्रतिनिधी
-शहरात पहिल्या टप्प्यातील श्रींच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या गणेश मंडळ, व्यायाम शाळेच्या पदाधिकाऱ्यांच्या सत्कार राम रहीम उत्सव समिती व आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाच्या वतीने गमछा देऊन करण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती मंदिर परिसरात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांनी गणेश मंडळ व व्यायामशाळेच्या पदाधिकाऱ्यांच्या सत्कार केला.
याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे,माजी पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, माजी नगरसेवक परवेज खान, माजी नगरसेवक रवींद्र पवार ,माजी नगरसेवक गजेंद्र शिंपी, माजी नगरसेवक मोहन माळी,माजी नगरसेवक जगन माळी,माजी नगरसेवक निंबा माळी,ग्रा.पं सदस्य रुपेश जगताप आदी उपस्थित होते.








