नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील श्रॉफ हायस्कूलमधील इयत्ता ८ वीचा विद्यार्थी वैभव प्रकाश मराठे याने घरी इस्रोचा चंद्रयान ३ देखावा सादर केला आहे. गणेश मंडळामध्ये हा देखावा विशेष आकर्षण ठरला आहे. त्याच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
वैभव मराठे हा नेहा पार्क टाटा शोरूमच्या पाठीमागील रहिवाशी आहे. त्याच्या हा इस्रो चंद्रयान ३ चा देखावा तेथीलच जय भद्रा व्यायाम शाळेच्या गणेश मंडळाजवळ आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी चंद्रयान ३ चा देखावा विशेष आकर्षण ठरत आहे.
ते पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करीत आहेत. गणपती काळात विविध मंडळातर्फे विद्युत रोषणाईसह विविध देखावे सादर करण्यात येतात. मात्र यावर्षी नंदुरबार शहरातील नेहा पार्क मधील वीरभद्रा व्यायाम शाळेच्या गणेश मंडळाजवळ चांद्रयान ३ चा देखावा विशेष आवर्षण ठरला आहे. चांद्रयान तीन या देखावा बनवण्यासाठी वैभवला त्याच्या आई-वडिलांसह शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.