नंदुरबार l प्रतिनिधी
धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये आरक्षण मिळावे यासाठी राज्य शासनाकडून सुरू असलेला खटाटोप तात्काळ थांबवावा, राज्यात लागू असलेल्या अनुसूची पाचची अंमलबजावणी तात्काळ करावी, केंद्र व राज्य शासनाच्या आदिवासींविरुद्ध सुरू असलेले कृत्य तात्काळ थांबवावे, अशी मागणी वीर एकलव्य आदिवासी सेनेने केली आहे.
याबाबत नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की धनगर समाजाकडून आदिवासी समाजात घुसखोरी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घुसकोरीला राज्य शासनाकडून ही पाठिंबा दिला जात आहे. केंद्र व राज्य शासन देखील आदिवासी समाजाविरुद्ध कृत्य करीत असल्याच्या विर एकलव्य आदिवासी सेनेने तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे. धनगर समाजाची आदिवासी समाजात होणारी घुसखोरी थांबविण्यात यावी.
मशीनचे आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य शासन व मंत्र्यांच्या सुरू असलेला खटाटोप तात्काळ थांबवावा. राज्यात लागू असलेली अनुसूची पाच ची अंमलबजावणी तात्काळ करा सुरू करावी. केंद्र व राज्य शासनाचे आदिवासी विरुद्ध सुरू असलेले थांबविण्यात यावे, अशी मागणी विर एकलव्य आदिवासी सेनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष ॲड.जयकुमार पवार, महिला जिल्हाध्यक्ष ॲड.शितल गायकवाड, महासचिव तुलसीदास गावित, तालुका युवा अध्यक्ष शंकर ठाकरे, सुनील भिल, लक्ष्मण कोकणी, दिनेश ठाकरे आदींनी निवेदनातून केली आहे.