नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जमाती प्रवर्ग पेसा क्षेत्रातील शिक्षक पद भरती 2022-23 च्या नवीन संच मान्यतानुसार करण्यात यावी अशी मागणी आदिवासी डी.टी.एड, बी.एड, टीईटी सीटीईटी, टीएआयटी पात्र कृती समितीने केली आहे.
याबाबत उबाठा शिवसेना युवती सेनेच्या महाराष्ट्र राज्य सहसचिव मालती वळवी यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरती बाबत तीन एप्रिल 2023 चे शासन प्रपत्र वित्त विभागाच्या परवानगीनुसार रिक्त पदांच्या 80 टक्के रिक्त पदे भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. पेसा क्षेत्रातील 13 जिल्ह्यांना आदेश देण्यात आले असून त्यात नंदुरबार जिल्हा परिषदेचा ही समावेश आहे.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या पेसा क्षेत्रातील शिक्षकांची नवीन संच मान्यतेनुसार 295 पदे रिक्त असून मात्र ऑफलाइन भरती प्रक्रियेत ७४ पदसंख्येसाठी कागदपत्र पडताळणीसाठी 150 उमेदवारांना बोलविण्यात आले आहे. जुन्या संच मान्यतेनुसार पदभरती न करता नवीन संच मान्यतेनुसार कवी याकरिता माध्यमातून नवीन संच मान्यतेनुसार अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील शिक्षकांची पदे भरण्यासाठी त्वरित कार्यवाही व्हावी, अशी मागणी आदिवासी डी.टी.एड, बी.एड, टीईटी सीटीईटी, टीएआयटी पात्र कृती समितीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष के.बी. पावरा, संदीप गावित, इंदिरा कोकणी मीनाक्षी कोकणी, अर्चना वळवी, ज्योती बागुल, संगीता गांगुर्डे आदींनी निवेदनातून मालती वळवी यांच्याकडे केली आहे.








