नंदूरबार l प्रतिनिधी
येथील माळीवाड्यातील संत सावता महाराज मंदिरात नंदुरबार जिल्ह्यात अखिल भारतीय माळी महासंघाची ओबीसी समाज आरक्षण संदर्भात बैठक घेण्यात आली.
सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास पाटील हे होते.ओबीसी बांधवांच्या आरक्षण संदर्भात अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले .यात वासुदेव देवरे, आर.के.माळी, रमेश मगरे, अतुल सूर्यवंशी, संतोष माळी, सुनील सोनवणे, काशिनाथ माळी, हरिश्चंद्र रेडे, ज्ञानेश्वर माळी, मोहन माळी, मधुकर माळी, निंबा माळी, जगन्नाथ माळी,पंडित माळी,बापू महाजन यांनी सविस्तर चर्चा करून ओबीसी समाज आरक्षण संदर्भात पुढील आंदोलनात्मक रणनीती ठरावाप्रमाणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देणे.याबाबत निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत नंदुरबार जिल्ह्याच्या अखिल भारतीय माळी महासंघाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी जगन्नाथ लोटन माळी तर नाशिक विभाग संघटक पदी मोहन रायबान माळी तसेच नंदुरबार शहराध्यक्षपदी मधुकर वेळू माळी यांची निवड करण्यात आली.बैठकीत माळी समाजातील पंच आनंद माळी, निंबा माळी,माणिक माळी, पंडित माळी वासुदेव माळी, धनराज माळी, झगा माळी, रघुनाथ माळी, गंगाराम लोखंडे, श्रीराम महाजन, नरेंद्र जाधव,भीमराव देवरे, भटू महाले, सुभाष माळी, रामभाऊ माळी, सुधाकर सोनवणे, सदाशिव माळी, श्याम माळी,
अविनाश माळी, आनंद माळी, कुणाल माळी, रामू माळी, भालचंद्र माळी, रवींद्र माळी, छोटू माळी, मका माळी, प्रकाश माळी आदि. उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशिनाथ माळी यांनी केले तसेच आभार प्रदर्शन नरेंद्र जाधव यांनी केले. अखिल भारतीय माळी महासंघाचे उर्वरित जिल्हा तालुका शहर कार्यकारणी पदाधिकारी निवड लवकरच करण्यात येणार आहे तरी समाज सेवेत ज्या बांधव कार्यकर्ते तरुणांना आवड आहे असे कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय माळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे