Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गुन्हेगारी टोळीतील 3 इसम 2 वर्षांसाठी नंदुरबार जिल्ह्यातुन हद्दपार

team by team
September 20, 2023
in क्राईम
0
गुन्हेगारी टोळीतील 3 इसम 2 वर्षांसाठी नंदुरबार जिल्ह्यातुन हद्दपार

नंदूरबार l प्रतिनिधी

आगामी सण / उत्सवाच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच गुन्हेगारांवर वचक राहावा याकरीता पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळीतील एकुण 3 इसमांना महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 55 च्या प्राप्त अधिकारान्वये नंदुरबार जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार केलेले आहे. हद्दपार करण्यात आलेले सर्व 3 इसम हे शहादा तालुक्याच्या सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील आहेत.

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी बाधा ठरणारे तसेच मालमत्ता व शरीराविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती घेवन त्यांचेवर दाखल गुन्ह्यांचा आढावा घेतला असता सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील काही आरोपी त्यांची दहशत व वचक ठेवण्यासाठी बेकायदेशीररीत्या टोळी तयार करुन नियमितपणे शरीराविरुध्दचे गुन्हे करण्याचे सवयीचे असल्याचे त्यांचे निदर्शनास आले. त्यांचेपासून सामान्य नागरिकांच्या मालमत्तेस व जिवीतास धोका निर्माण झालेला असल्याचे त्यांना आढळून आले आहे. त्यांचेवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही. त्याप्रमाणे अशा आरोपीतांवर कठोर प्रतिबंधक कारवाई करावी याबाबत पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले होते.

सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या टोळीतील 3 इसमांविरुध्द् शरीराविरुध्दचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यावरुन सारंगखेडा पोलीस ठाण्याकडून एका टोळीवर प्रतिबंधक कारवाई करणेबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयात प्राप्त झाला. सदर प्रस्तावाचा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी आढावा घेवुन प्रस्तावाची छाननी केली. तसेच योग्य ती कायदेशीर प्रकिया पार पाडून 3 इसमांना 2 वर्ष कालावधीसाठी नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी 18 सप्टेंबर रोजी दिले आहेत.

आनंदा धोंडू कोळी रा. शेल्टी ता. शहादा, रजत आनंदा सावळे वय 26 रा. शेल्टी ता. शहादा जि. नंदुरबार, राहुल आनंदा सावळे रा. शेल्टी ता. शहादा यांना हद्दपार करण्यात आले आहे.

हद्दपार आदेशाची अमंलबजावणी तातडीने करण्यात येत असुन हद्दपार इसमांनी आदेश प्राप्त झाल्यावर 48 तासाचे आत तातडीने जिल्हा हद्दीबाहेर निघून जाणेबाबत आदेश देण्यात आले आहेत. तसेच हद्दपार इसमांनी नंदुरबार जिल्ह्यात येतांना नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक किंवा मा. न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे. हद्दपार आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्यांचे विरुध्द् प्रचलीत कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच वरील 3 हद्दपार इसम नंदुरबार जिल्ह्यात कुठेही दिसून आल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे किंवा पोलीस नियंत्रण कक्ष, नंदुरबार येथे कळवावे असे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी आवाहन केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हयात 766 गणेश मंडळांतर्फे गणरायाची स्थापना

Next Post

रामभक्तांच्या प्रयत्नांनी सुखरूप आलो मालसर येथे अडकलेल्या भाविकांनी केले अनुभव कथन

Next Post
रामभक्तांच्या प्रयत्नांनी सुखरूप आलो मालसर येथे अडकलेल्या भाविकांनी केले अनुभव कथन

रामभक्तांच्या प्रयत्नांनी सुखरूप आलो मालसर येथे अडकलेल्या भाविकांनी केले अनुभव कथन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add